भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) दिल्लीने स्वस्त दरात करोनाची चाचणी करणारे किट विकसित केले आहे. आज, बुधवारी या किटचे अनावरण होणार असून, ते महागड्या चाचण्यांना एक उत्तम पर्याय ठरणार आहे.

आयआयटी दिल्लीकडून कंपन्यांना या किटच्या निर्मितीचा खुला परवाना दिला जाणार आहे. मात्र त्याच्या विक्रीसाठी मर्यादित किमतीची अट असणार आहे. सध्या तरी संस्थेकडून प्रतिकिट ५०० रुपये किंमत ठरवण्यात आली आहे.

‘न्यूटेक मेडिकल डिव्हाइस’ या कंपनीकडून बुधवारी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रेमश पोखरियाल निशंक आणि मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत या किटचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र कंपनीने अद्याप या किटची किंमत जाहीर केलेली नाही.

अधिक वाचा  शिवकालीन श्रीक्षेत्र म्हस्वेश्र्वर खारावडे वज्रलेपविधी पुर्ण; 500 किलो शेंदूरलेपाचे जला विसर्जन पुन्हा मंदिर खुले

‘या किटमुळे देशात किंमत व व्यापक वापर अशा दोन्ही स्तरांवर करोना चाचणीचे समीकरण पूर्णतः बदलणार आहे. या उत्पादनाला भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (डीसीडीआय) यांची मान्यता मिळाली असून, उद्या या किटचे अनावरण होणार आहे’, असे आयआयटी दिल्लीचे संचालक व्ही. रामगोपाल राव यांनी मंगळवारी सांगितले.

आयआयटी दिल्लीचे तंत्रज्ञान वापरून ‘न्यूटेक मेडिकल डिव्हाइस’ ही कंपनी अतिशय माफक दरात दरमहा सुमारे दोन कोटी चाचण्या करू शकणार असून, करोना चाचणीचे हे उत्तम उदाहरण ठरणार आहे, असेही ते म्हणाले.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समितीच्या विद्यमाने प्रशिक्षित बौद्धाचार्यांच्या परीक्षा परीक्षाकेंद्रात शिस्तबद्ध वातावरणात संपन्न

अचूक चाचणी, माफक दर
आयआयटी दिल्लीने विकसित केलेली पद्धत आधुनिक आहे. यात चाचणीची अचूकता अजिबात कमी न होता ती मोफक दरात करता येणार असल्याचे आयआयटी दिल्लीच्या पथकाचे म्हणणे आहे.