महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये ६ हजार ४९७ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर १९३ मृत्यूंची नोंद गेल्या २४ तासांमध्ये झाली आहे. सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील एकूण करोनाग्रस्तांची संख्या २ लाख ६० हजार ९२४ इतकी झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ४ हजार १८२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

२ लाख ६० हजार ९२४ रुग्णांपैकी १ लाख ४४ हजार ५०७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १ लाख ५ हजार ६३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आत्तापर्यंत महाराष्ट्रात करोनाची लागण होऊन १० हजार ४८२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

अधिक वाचा  महाराष्ट्र हादरणार! ठाकरेंना अटक करण्याची तयारी सुरू? महाराष्ट्र भाजपची उद्धव ठाकरेंनाही घेरण्याचे संकेत

महाराष्ट्रातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट ५५.३८ टक्के झाला आहे. तर महाराष्ट्रातील मृत्यू दर ४.२ टक्के झाला आहे. आत्तापर्यंत १३ लाख ४२ हजार ७९२ नमुन्यांपैकी २ लाख ६० हजार ९२४ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.

सध्याच्या घडीला राज्यात ६ लाख ८७ हजार ३५३ लोक होम क्वारंटाइन आहेत. तर ४१ हजार ६६० लोक संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. सध्याच्या घडीला राज्यात १ लाख ५ हजार ६३७ केसेस अॅक्टिव्ह आहेत असंही महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.

प्रमुख शहरांमधल्या अॅक्टिव्ह केसेस
मुंबई – २२ हजार ९००
ठाणे – ३४ हजार ४३०
पुणे – २२ हजार १९६
सातारा-६८३
नाशिक-२८०७
औरंगाबाद-३७८७
नागपूर – ६२५

अधिक वाचा  राजू शेट्टी यांनी पाठिंबा न घेतल्यास उमेदवार देणार, हातकणंगले लोकसभेसाठी मविआची स्ट्रॅटेजी ठरली!

या शहरांमध्ये वाढला लॉकडाउन
पुणे, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, कल्याण डोंबिवली या ठिकाणी लॉकडाउन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर रायगडमध्येही आजच लॉकडाउन आणखी १० दिवसांनी वाढवण्याची घोषणा झाली आहे. एकीकडे देश अनलॉकच्या दिशेने पावलं टाकतो आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील शहरांमध्ये लॉकडाउन होतं आहे. काही शहरांमधून लॉकडाउनला विरोध होतो आहे.

प्रशासनाने काय आवाहन केलंय?
गरज असेल तरच घराबाहेर पडा,

घराबाहेर पडताना मास्क वापरा.

बाहेर वावरताना सोशल डिस्टन्सिंग पाळा.

बाहेरुन घरी आल्यानंतर सॅनेटायझरचा वापर करा.

हात-पाय साबण लावून स्वच्छ धुवा.

करोनाची लक्षणं दिसत असल्यास तातडीने टेस्ट करा.

अधिक वाचा  हार्दिक परत गेल्यानंतर जीत समोरील आव्हानं कोणती? सर्वाधिक चिंता ‘या’ गोष्टीची!

या आणि अशा सगळ्या सूचना प्रशासनाने जनतेला केल्या आहेत.