पुणे शहरात आज दिवसभरात ६२१ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, २४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाल आहे. यामुळे शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या २७ हजार ५२५ वर पोहचली आहे. आज अखेर करोनामुळे ८४० जणांना जीव गमावावा लागला आहे. तर करोनावर उपचार घेणार्‍या ४८६ रुग्णांची तब्येत ठणठणीत असल्याने, त्या सर्वांना आज घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत १७ हजार ४८२ रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात आज नव्याने ३३५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आठ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. यात बीड येथील ९५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. तर ३१८ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांनी सात हजारांची संख्या ओलांडली असून एकूण संख्या ७ हजार २७६ वर पोहचली आहे. यापैकी, ४ हजार ३१२ जण करोनामुक्त झाले आहेत.

अधिक वाचा  अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा, महायुतीच्या जागावाटपावर मोठं वक्तव्य

देशभरासह राज्यात करोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढतच असला, तरी देखील करोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील करोनामुक्त रुग्ण संख्या आता दीड लाखाच्या उंबरठ्यावर आली असल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. राज्यात आज ३ हजार ३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून, आतापर्यंत राज्यात १ लाख ४० हजार ३२५ जणांनी करोनावर मात केली आहे. दरम्यान, सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.

अधिक वाचा  मॅच जिंकताच विराटचा अनुष्काला व्हिडीओ कॉल; मुलांना दिले फ्लाइंग किस

मागील २४ तासांत राज्यभरात ७ हजार ८२७ नवे करोना रुग्ण आढळले तर १७३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या २ लाख ५४ हजार ४२७ वर पोहचली आहे. तर, १० हजार २८९ जणांचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे.