पुण्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात कोरोनाची धास्ती निर्माण झाली आहे. महापौरांच्या संपर्कात आलेल्या नेते आणि अधिकाऱ्यांना होम क्वारंटाइन होण्यास सांगण्यात आलं आहे. यात आयुक्तांसह अनेक ज्येष्ठ अधिकारी आणि राजकीय नेत्यांचाही समावेश आहे. आत्तापर्यंत अधिकारी, नगरसेवक आणि पालिकेचे कर्मचारी अशा अंदाजे 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

कामानिमित्त सतत बाहेर असणं, लोकांचा संपर्क आणि प्रतिबंधित भाग, हॉस्पिटलचे दौरे यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना बाधा झाल्याचं सांगितलं जात आहे. महत्त्वाचे अधिकारीच क्वारंटाइन झाल्याने त्याचा परिणाम कामावरही जाणवत आहेत. हे अधिकारी घरूनच काम करत असले तरी त्यांच्या कामावर मर्यादा येत असल्याने हा परिणाम जाणवत आहे.

अधिक वाचा  धनुषला आंतरराष्ट्रीय स्तरावरही सन्मान; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर

प्रशासकीय आणि आरोग्य व्यवस्थांवर प्रचंड ताण येत असल्याने अधिकारी चिंतेत आहेत. त्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढतेच आहे. त्यामुळे या आव्हानांना सामोर कसं जायचं असा प्रश्न नेते आणि अधिकाऱ्यांना पडला आहे. पुण्याचे प्रथम नागरिक अर्थात महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता त्यांच्यासह कुटुंबातील सदस्य सुद्धा कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. पुण्यात लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे.

पुण्याचे महापौर महापौर मुरलीधर मोहोळ यांना 4 जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. मुरलीधर मोहोळ यांच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी करण्यात आली होती. त्यांच्या कुटुंबीयांचीही कोरोनाची चाचणी घेण्यात आली होती. यात मोहोळ कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

अधिक वाचा  ZP, पंचायत  सदस्य संख्या वाढ; हिवाळी अधिवेशनात विधेयक

दुसरीकडे भाजपचे माजी आमदार योगेश टिळेकर यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे 5 जुलै रोजी स्पष्ट झालं होतं. त्यांच्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या माजी महापौर वैशाली बनकर यांच्या कुटुंबीयातील 9 सदस्यांनाही कोरोना झाल्याचं निष्पन्न झाले आहे.