नवी दिल्ली: देशभरात करोना विषाणूचा कहर सुरू असताना एक चांगली बातमी येत आहे. येत्या १५ ऑगस्ट या दिवशी करोनाची कोव्हॅक्सीन या नावाची लस लॉन्च होत आहे. ही लस हैदराबादच्या भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड (बीबीआयएल) या फार्मास्यूटीकल कंपनीने तयार केली आहे. भारत बायोटेक आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) संयुक्तपणे ही लस लॉन्च करण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
नुकतीच या लशीला मानवावर प्रयोग करण्यासाठी परवानगी देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने जारी केलेल्या पत्रानुसार, या लशीचा मानवावरील प्रयोग ७ जुलै या दिवशी सुरू करण्यात येणार आहे. या नंतर जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर १५ ऑगस्ट या भारतीय स्वातंत्र्यदिनी ही लस लॉन्च केली जाईल. या पूर्वीत ही लस बाजारात उपलब्ध होणार आहे.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदचे हे पत्र आयसीएमआर आणि सर्व स्टेकहोल्डरनी (यात एम्सचे डॉक्टरही आहेत) जारी केले आहे. जर ही चाचणी प्रत्येक टप्प्यावर यशस्वी झाली, तर येत्या १५ ऑगस्टपर्यंत ही लस बाजारात येऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने १५ ऑगस्टपर्यंत ही लस उपलब्ध होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आम्ही ही लस यशस्वी करण्यासाठी टॉप प्रायॉरिटीवर काम करत आहोत, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदने म्हटले आहे.
भारत बायोटेकला लस बनवण्याचा दीर्घ अनुभव
कोवॅक्सीनची टप्पा-१ आणि टप्पा-२ ची मानवावर चाचणी करण्यासाठी डीसीजीआयने हिरवा झेंडा दाखवला आहे असा दावा हैदराबादमधील भारत बायोटेकने काही दिवसांपूर्वीच केला होता. भारत बायोटेकला लशी बनवण्याचा जुना अनुभव आहे.
भारत बायोटेक कंपनीने पोलिओ, रेबीज, रोटाव्हायरस, जपानी इन्सेफ्लायटीस, चिकनगुनिया आणि जिका व्हायरसवर लस बनवली आहे. मानवावर चाचणी करण्यासाठी एनरोलमेंटची सुरुवात ७ जुलैला होणार आहे. या नंतर चरणबद्ध पद्धतीने चाचणी केली जाईल. जर ही चाचणी यशस्वी झाली, तर येत्या १५ ऑगस्टला ही लस बाजारात उपलब्ध होईल.

अधिक वाचा  महाराष्ट्रातील महासर्व्हेंचा धडाका सुरूच; संपूर्ण यादीच जाहीर उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांचे टेन्शन वाढलं