मुंबई : ‘आसमान में जब तक सितारे रहेंगे…’ अजूनही हे गाणं प्रत्येक जण गुणगुणतं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि अभिनेत्री अंकिता लोखंडे यांच्या पवित्र रिश्ता या मालिकेतील हे गाणं. हे गाणं ऐकलं की सुशांत आणि अंकिता यांच्या प्रेमाची आठवण होतेच. रिल लाइफच नाही तर रिअल लाइफमध्येही या कपल्सवर चाहत्यांनी खूप प्रेम केलं. त्यांची ही जोडी सर्वांनाच आवडू लागली. आता या दोघांचाही असा व्हिडीओ समोर आला आहे, जो कुणी कधीच पाहिला नाही.
सुशांत आणि अंकिताच्या ‘जैसी हो वैसी रहो’ या गाण्याचा हा व्हिडीओ आहे.पवित्र रिश्तादरम्यान त्यांचं हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं. मात्र याआधी ते रिलीज होऊ शकलं नाही. सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याच्या चाहत्यांसाठी आता हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे आणि सर्वांना हे गाणं खूप आवडलं आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतील मानव-अर्चना या जोडीने लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण त्यासोबत नंतर अंकिता आणि सुशांत हे दोघेही एकत्र आले होते.
मात्र नंतरच्या काळात काही मतभेद झाले आणि सुशात-अंकिता यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जेव्हा सुशांत आणि अंकिताचा ब्रेकअप झाला तेव्हा बर्‍याच बातम्या समोर आल्या होत्या. या बातम्यांना उत्तर देताना सुशांतने स्वत: असे म्हटले होते की, नाही अंकिता मद्यपी आहे, नाही मी वुमेनायजर आहे. ब्रेकअप करण्याचे कारण सांगून तो म्हणाला की – ‘लोक फक्त एकमेकांपासून दूर जातात .. आणि हे खूप दुर्दैवी आहे’
त्यानंतर सुशांत बराच काळ खचलेल्या मानसिकतेत गेला होता. काही दिवसांपूर्वीच सुशांतची एक्स गर्लफ्रेन्ड अंकिता लोखंडे हिची एका बिझमनसोबत एंगेजमेन्ट झाली आहे. सुशांतच्या आत्महत्येनंतर अंकिताला मोठा धक्का बसला आहे. सतत सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अंकिता आता सोशल मीडियापासून दूर झाली आहे. मात्र या दोघांचेही व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागलेत.

अधिक वाचा  ‘स्थानिक’च्या निवडणुका लांबल्या ‘या’ पदासाठी जोरदार लावली फिल्डिंग; 2025-26 चे 1200 कोटींचे अंदाजपत्रक