करोनाचा शिरकाव झाल्यापासून राज्यात एका दिवसात पहिल्यादांच बाधित झालेल्या रुग्णांची उच्चांकी नोंद झाली. गेल्या तीन दिवसांपासून राज्यात पाच हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असून आज उच्चांकी नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रूग्णांचा आकडा १ लाख ६४ हजार ६२६ इतका झाला आहे. तर दोन हजार ३३० रुग्णांना दिवसभरात डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून आकडेवारी जाहीर केली.
राज्यात मागील तीन दिवसांपासून पाच हजारांपेक्षा जास्त संख्येनं करोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आज (२८ जून) नव्या उच्चांकाची नोंद झाली आहे. राज्यात आज ५,४९३ करोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता १ लाख ६४ हजार ६२६ इतकी झाली आहे. आज नवीन २ हजार ३३० करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण ८६ हजार ५७५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी परतले आहेत. राज्यात सध्या एकूण ७० हजार ६०७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात आज 5318 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व एकूण संख्या आता 159133 अशी झाली आहे. आज नवीन 4430 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 84245 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 67600 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
तीन दिवसांपासून पाच हजारांची भर…
राज्यातील करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून आरोग्य विभागाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीवरून ती दिसून येत आहे. राज्यात २६ जून रोजी ५ हजार २४ रुग्ण आढळून आले. एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येण्याची ही पहिलीच वेळ होती. मात्र, त्यानंतर सलग दोन दिवसांपासून संख्येत आणखी वाढ झाली आहे. २७ जून रोजी राज्यात ५ हजार ३१८ रूग्ण आढळून आले होते. त्यानंतर आज साडेपाच हजारांच्या जवळपास रुग्ण आढळून आले आहेत. ही एका दिवसात आढळून आलेल्या रुग्णांची राज्यातील आतापर्यंतची उच्चांकी संख्या आहे.

अधिक वाचा  मराठवाड्यात भाजपची मोठी खेळी! शिंदेसेनेला फक्त एकच जागा मिळणार?; संभाजीनगरही भाजपकडेच