राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकरांवर उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आहेत. त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केलीय. ज्या नेत्याचं डिपॉझिट जप्त झालं होतं त्याच्याविषयी काय बोलायचं. हा सूर्यावर थूंकण्याचा प्रकार आहे अशी टीका त्यांनी केली. साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, शरद पवार यांना महाराष्ट्र आणि देश ओळखतो ज्या माणसाची योग्यता नाही त्याने काय बोलावे. सूर्याकडे पाहून थुंकण्याचा हा प्रकार आहे. मोठा नेता असता तर गोष्ट वेगळी. त्यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. म्हणजे तुम्ही ओळखू शकता. त्यांच्या वक्तव्याला जास्त महत्व देऊ नये. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना उत्तरं देतांना तोंडाला फेस आला. एखाद्याला नको तेवढे मोठ केल की असं होतं.
संकट आले की शरद पवारांना बसवत नाही. आजही ते साताऱ्यात आले, पवार साहेबानी भर पावसात सभा घेतली. मोदींनंतर पवार साहेबांच्याकडे पाहिले जाते. राजकीय कारकिर्दीत पवार साहेब कधी घसरले नाहीत. पवार साहेब सारखं काम करत असतात. यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत त्यांचं नाव घेतलं जातं.
पडळकरांसारख्या पात्रता नसलेल्या लोकांना डोक्यावर घेतल की असं होत. लोकच त्यांना जागा दाखवतील. प्रत्येकाने लायकी पाहून बोलावे. शब्द जपून वापरावे. मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंह राजे भेटले त्यांचे प्रश्न घेऊन आले होते. ते प्रश्न ऐकून घेतले. पुणे जिल्ह्यापेक्षा साताऱ्याने प्रेम दिलं आहे. कोणी काय करायचा त्यांचा प्रश्न आहे.

अधिक वाचा  पुण्यात तगडी लढत? ‘डॅशिंग’चेहऱ्यावर भाजपाचं हॅट्रिकचं लक्ष्य मविआचाही ‘डॅशिंग’सह सोशल इंजिनिअरिंग’चा मूड