मुंबईः मुंबईत करोना रुग्णांची संख्या घटत असून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. आज मुंबईत १ हजार २९७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४४ जणांना करोनामुळं जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आज दिवसभरात वेगवेगळ्या रुग्णालयांतून ५९३ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ७२ हजार २८७ इतकी झाली आहे. तर, एकूण ४ हजार १७७ रुग्णांचा करोनामुळं बळी गेला आहे. मुंबईत २८ हजार ३६६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
शुक्रवारी ४४ करोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. तर, मागील ४८ तासांत ७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी ८८ रुग्णांना दीर्घकालीन आजार होता. त्यातील ८० रुग्ण पुरुष व ३७ महिला रुग्णांचा समावेश आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी ७ जणांचे वय ४० वर्षाखालील होते. तर, ६९ जणांचे वर ६० वर्षाावरील होतं. तर उर्वरित ४१ रुग्ण हे ४० ते ६० वर्ष वयोगटातील होते.
करोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूंमध्ये श्वसनाचे विकार, रक्तदाब, मधुमेह, कर्करोग तसेच दीर्घकालीन आजार असणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे पालिकेच्या आकडेवारीतून स्पष्ट होते आहे. रुग्णांच्या संपर्कातील रुग्णांचे तात्काळ विलगीकरण, वाढवण्यात आलेल्या चाचण्या, रुग्णांचे मानसिकता सकारात्मक राहील यादृष्टीने केलेले प्रयत्न यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दरम्यान, राज्यात मात्र करोना बाधित रुग्णांची संख्या दीड लाखांच्या घरात पोहोचली आहे. चिंताजनक बाब म्हणजे आज राज्यात तब्बल ५ हजार ०२४ नवे रुग्ण आढळले आहेत. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येनं करोनाचे रुग्ण आढळून आल्यानं राज्यातील आरोग्य यंत्रणेसमोर संख्या आटोक्यात आणण्याचं आव्हान उभं राहिलं आहे.

अधिक वाचा  सातासमुद्र पार ‘जय भीम’ नारा! महामानवाला अभिवादन! किली पाॅलचे सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल