योगगुरू बाबा रामदेव व पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी कोविड-१९ च्या उपचारासाठी औषध तयार केल्याचा दावा करून लोकांची दिशाभूल केली आहे, तसेच लाखो लोकांचे जीव धोक्यात घातले आहेत, असा आरोप करणारी फौजदारी तक्रार बिहारच्या एका न्यायालयात करण्यात आली आहे.
या दोघांविरुद्ध फसवणूक आणि गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचल्यासह इतर आरोपांखाली एफआयआर दाखल करावा, अशी मागणी करणारी ही तक्रार मुझफ्फरपूरचे मुख्य न्यायदंडाधिकारी मुकेश कुमार यांच्या न्यायालयात मंगळवारी करण्यात आली. तक्रारकर्त्यां तमन्ना हाश्मी या स्वत:ला सामाजिक कार्यकर्त्यां म्हणवून घेतात. न्यायालयाने हे प्रकरण ३० जूनला सुनावणीसाठी ठेवले आहे.

अधिक वाचा  प्रफुल्ल पटेल यांना सीबीआयकडून मोठा दिलासा, कथित 840 कोटींच्या घोटाळ्याचा तपास बंद