पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या दोन्ही देशातील लष्करी संघर्षाचे पडसाद अजूनही देशात उमटत आहे. गलवान खोऱ्यात १५ जून रोजी झालेल्या संघर्षासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पंतप्रधान कार्यालयानं वेगवेगळी विधान केल्यानं विरोधक आणखी आक्रमक झाले आहेत. त्यावरून राहुल गांधी यांनी मोदींवर शरसंधान करताना सरेंडर मोदी अशी टीका केली होती. या टीकेवरून काहीजणांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. त्याला काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठकीत चिनी सैन्यानं भारतीय भूभागात घुसखोरी केली नसल्याचा, तसेच कोणतीही चौकी अथवा जवान ताब्यात घेतले नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून वेगळा खुलासा करण्यात आला. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या विधानाचा चिनी माध्यमांनीही गैरफायदा घेतल्याचं दिसून आलं. या सगळ्या घटनांक्रमात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर नरेंद्र मोदी नव्हे सरेंडर मोदी, अशी टीका केली होती. त्यावरून भाजपा समर्थकांनी राहुल गांधींवर टीका केली.
भाजपा समर्थकांकडून करण्यात आलेल्या टीकेला काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते पवन खेरा यांनी उत्तर दिलं आहे. “मोदीजींच्या प्रतिमेला जर कुणाकडून धोका असेल, तर तो भक्तांपासूनच आहे. कोणत्याही भक्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला नाही. आता सगळे सलेंडरची योग्य स्पेलिंग सांगण्यासाठी मैदान आले आहेत,” अशी टीका काँग्रेसनं केली आहे.
चीन सीमेवर पूर्व लडाखमध्ये झालेल्या संघर्षानंतर राहुल गांधी यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सातत्यानं टीका केली जात आहे. आता राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांचे नाव बदलून नरेंद्र मोदी हे तर खरे ‘सरेंडर मोदी’ असल्याची टीका टि्वटरवरून केली होती. त्यांच्या या टीकेनंतर काँग्रेस विरुद्ध भाजपा असा शाब्दिक वॉर सुरू झाला.

अधिक वाचा  हवेच्या वरच्या स्तरात प्रती चक्रवाताची स्थिती पारा ४१ अंशांवर, उष्णतेच्या झळा किती दिवस राहणार?