बीडःस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या आमदारीवरून संघटनेत निर्माण झालेल्या वादावर अखेर पडला आहे. राज्यभरातील कार्यकर्त्यांनी राजू शेट्टी यांना पांठिबा दिला होता. स्वाभिमानीच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांनी रक्ताने पत्र लिहून राजू शेट्टी यांच्याकडे आमदारकी स्वीकारण्याची मागणी केली आहे. पत्र रक्ताने यासाठी लिहिलं कारण शेतकऱ्यांसाठी रक्त सांडण्याचा तुमचा विचार जिवंत रहिला पाहिजे ही चळवळ टिकली पाहिजे आणि वाढली पाहिजे. असं पूजा मोरे यांनी पत्रात म्हटलं आहे.
साहेब,आपल्या आमदारकी वरून महाराष्ट्रात उलट सुलट चर्चा चालू आहेत. याकाळात तुम्हाला फोन करण्याची माझी हिंमत झाली नाही आपण आमदारकी स्वीकारावी ही पदाधिकारी म्हणून माझी इच्छा आहे. परंतु महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांची देखील आहे. या भावना आपण लक्षात घेऊन आपला आवाज विधानसभेत पोहचावा ही आमची इच्छा आहे. पद असो नसो मी आपल्याला सोबत आहे फक्त तुम्ही ढासळू नका. सेनापतीच ढासळला तर आमचं अर्ध अवसान गळून पडेल. आपण लढू साहेब, असं भावनिक पत्र पूजा मोरे यांनी लिहलं आहे.
फक्त एका आमदारकीसाठी राजीनामे देणारे आपण नाही. आपल्या राजीनाम्याने चळवळ फोडू इच्छिणाऱ्यांचे मनसुबे सफल होऊ देऊ नका. आपण अजून ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू. आपल्याला साहेबांचा विचार सोडून जमणार नाही. त्यात सर्व शेतकऱ्याचं हित आहे. असं आवाहन पूजा मोरे यांनी संघटनेतील पदधिकाऱ्यांना केलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राजू शेट्टी यांचे नाव विधान परिषदेसाठी देण्याचे निश्चित करण्यात आले होते. त्याला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील व खजिनदार अनिल मादनाईक यांनी विरोध केला होता. या दोघांसह संघटनेच्या प्रमुख नेत्यांची जयसिंगपूर येथे बैठक झाली. या बैठकीत घरातील भांडण घरातच मिटविण्याचा निर्णय झाला. त्यानुसार संघटनेच्यावतीने राजू शेट्टी यांचेच नाव विधान परिषदेसाठी सुचविण्याचे ठरले. यामुळे गेले दोन दिवस संघटनेत सुरू असलेले वादळ शमले आहे.

अधिक वाचा  हॉटेल ताज लँड्समध्ये बोलणी फिस्कटली, महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी