मुंबई : खासगी कंपन्या आपले ग्राहक टिकवून ठेवण्यासाठी नवनवीन योजना लाँन्च करत असतात. आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने या स्पर्धेत उतरताना दिसत आहे. BSNL ने आपल्या युजर्संसाठी नवीन प्लान लाँन्च केले आहेत. गेलेले ग्राहक परत खेचण्यासाठी BSNL लागोपाठ नवीन प्लान आणीत आहे. बीएसएनएलने केवळ १९ रुपयांत ३० दिवस अनलिमिटेड कॉलचा नवा प्लान आणला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
BSNL कंपनीने नुकतेच 100Mbps स्पीड सोबत १.४ टीबी डेटाचा प्लान लाँन्च केला आहे. परंतु, व्हाईस ओन्ली एसटीव्ही कंपनीकडे ५ व्हाईस ओन्ली एसटीव्ही आहेत. ज्याची सुरुवात १९ रुपयापासून सुरु होते. हे प्लान अनलिमिटेड कॉलिंगसोबत येतात. दरम्यान, ही ऑफर केवळ तामिळनाडू सर्कलमध्ये मिळणार आहे.
ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर कॉल करु शकतो, पण…
BSNLचा व्हाईस ओन्ली कॅटगरी अंतर्गत हा स्वस्त टॅरिफ व्हाऊचर आहे. या व्हॉऊचरची किंमत १९ रुपये आहे. या व्हाऊचरमध्ये कंपनी अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा देते. कॉल्स पूर्णपणे मोफत नाही. यासाठी तुम्हाला २० पैसे प्रति मिनिट याप्रमाणे कॉलसाठी पैसे मोजावे लागणार आहेत. ग्राहक कोणत्याही नेटवर्कवर कॉल करु शकतात. याची वैधता ३० दिवस इतकी आहे.
९९ रुपयांचा नवा प्लान
बीएसएनएलचा ९९ रुपयांचा व्हॉऊचर सुद्धा अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट देतो. या व्हाऊचरमध्ये २५० मिनिट प्रतिदिन लिमिट आहे. प्रत्येक कॉलनंतर ग्राहकांना टॅरिफ या हिशोबाप्रमाणे पैसे मोजावे लागतील. तसेच प्रीमियम नंबर आणि इंटरनॅशनल नंबरवर कॉल साठी चार्ज द्यावा लागतो. या व्हाऊचरची वैधता २२ दिवसांची आहे. तसेच ७४ रुपयांचा ९० दिवसांचा व्हॅलिटीडी प्लान आहे. यात तुम्हाला २ जीबी डाटा मिळतो.
१३५ रुपयांचा व्हॉईस ओन्ली STV
बीएसएनएलचा १३५ रुपयांचा तिसरा व्हॉऊचर आहे. ज्यात दर दिवशी ३०० मिनिटांपर्यंत अनलिमिटेड कॉलिंग मिळते. ३०० मिनिट खर्च झाल्यानंतर कॉलिंगसाठी बेस टॅरिफ लागतो. या व्हॉऊचरची वैधता २४ दिवसांची आहे. तर २०९ रुपयांच्या बीएसएनएलचा एसटीव्ही वैधता ९० दिवस आहे. हा व्हॉऊचर अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट देतो. हा रिचार्ज केल्यानंतर अकाउंटमध्ये २५ रुपयांचा टॉकटाईम मिळतो. कोणत्याही नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी २ सेकंदासाठी १ पैसा चार्ज लागतो.
तसेच ३१९ रुपयांचा BSNLचा व्हॉईस ओन्ली STV आहे. ३१९ रुपयांच्या या एसटीव्हीत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग बेनिफिट मिळतात. याची वैधता ७५ दिवसांची आहे.

अधिक वाचा  महायुतीत जागावाटप गुंता असताना भाजपच्या मात्र सुस्साट 23 जागांचे वाटप शिंदे-अजितदादांच्या पदरी निराशाच?