नवी दिल्ली : टाळेबंदीमुळे शाळा ऑनलाइन शिक्षणावर भर देत असल्या तरी, देशात ५६ टक्के मुले स्मार्टफोनअभावी डिजिटल शिक्षणापासून वंचित असल्याचे समोर आले आहे. ग्रामीण भागांत ही समस्या अधिक तीव्र आहे.
‘सिनेरिओ अमिडस्ट कोविड १९-ऑनग्राऊंड सिच्युएशन अँड पॉसिबल सोल्युशन्स’ या अभ्यास अहवालानुसार, ५६.०१ टक्के मुलांकडे स्मार्टफोन नाही, तर ३१.०१ टक्के मुलांच्या घरी अजूनही टीव्ही नसल्याचे समोर आले आहे.
प्राथमिक पातळीवर (इयत्ता पहिली ते पाचवी) १,९५७६ मुलांची, इयत्ता सहावी ते आठवी १२२७७, तर इयत्ता नववी व दहावीतील ५५३७ आणि उच्च माध्यमिकच्या ३२१६ मुलांची पाहणी करण्यात आली. स्माइल फाऊंडेशनचा हा उपक्रम होता. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र यांसह २३ राज्यांत १६ एप्रिल ते २८ एप्रिलदरम्यान ही पाहणी करण्यात आली. स्माइल फाऊंडेशनचे शंतनु मिश्रा यांच्या मते या पाहणीतून डिजिटल दरी स्पष्ट झाली असून ती कमी करणे मोठे आव्हान आहे.

अधिक वाचा  पुणे महापालिका ‘प्रशासक’राज सुरक्षारक्षकांची मनमानी सुरूच; उपअभियंत्याला गेटबाहेर ६ ते ७जणांची मारहाण