नवी दिल्ली: करोना व्हायरसविरुद्धच्या लढाईत अतिशय महत्त्वाचे सुरक्षा कवच असलेले पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट अर्थात PPE किट बाबत भारताने एक मोठे यश मिळवले आहे. PPE किटसाठी आतापर्यंत चीनवर अवलंबून रहावे लागत होते. पण आता भारत याबाबत फक्त आत्मनिर्भर नाही झाला नाही तर तो आता PPE किट निर्यात करण्याच्या स्तरावर पोहोचला आहे.
केंद्र सरकारने करोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत PPE किट तयार करणाऱ्या कंपन्यांना प्रोत्साहन दिले होते. सरकारने या कंपन्यांना PPE किटसाठीचे जागतिक स्तरावरील प्रमाणपत्र मिळवण्याची तयारी करण्यास सांगितले होते, जेणे करून ते निर्यात करता येऊ शकेल.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार PPE उद्योगांनी किट निर्यात करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी आता निर्यातीसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवण्याची तयारी करावी लागले. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर देशांतर्गत मागणी लक्षात घेऊन निर्यातीचा निर्णय घ्यावा लागेल. PPE किट तयार करणाऱ्या कंपन्यांना आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र मिळवावे लागेल आणि अन्य देशांना अपेक्षित असलेला दर्जा आणि गुणवत्ता मिळवावी लागेल.
आरोग्य आणि सुरक्षा सारखे अनेक घटक आहेत. यासाठी प्रत्येक देशात वेगवेगळे नियम असल्याचे, एका अधिकाऱ्याने सांगितले. युरोपात PPE किट निर्यात करायचे असेल तर सीई मार्किंग तर अमेरिकेत निर्यात करायचे असेल तर फुड अॅण्ड अॅडमिनिस्ट्रेशनकडून प्रमाणपत्र मिळवावे लागते.
आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र दोन प्रकारे मिळते. एक तर संबंधित कंपन्या प्रमाणपत्र देणाऱ्या नियामकांना PPEचे किट पाठूवन देईल अथवा संबंधिक नियामक भारतात प्रयोग शाळा सुरू करतील आणि प्रमाणपत्र देण्याचे काम करतील. युरोपीय युनियन, ब्रिटन आणि अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात PPE किटची मागणी होत आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रासाठी केंद्र सरकार तसेच भारतीय दुतावास यांच्याकडे मदत मागितली आहे, असे एपेरल एक्सपोर्ट प्रमोशन काऊसिलचे चेअरमन ए.शक्तिवेल यांनी सांगितले.

अधिक वाचा  सुसाट! अवघ्या चार तासात ओलांडता येणार महाराष्ट्राची हद्द; वंदे भारतसंदर्भातील सर्वात मोठी अपडेट