ट्वेन्टी-२० विश्वचषक रद्द झाला की, आयपीएल खेळवण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पण भारतातील परिस्थिती आयपीएल खेळवण्यासाठी सुरक्षित नसेल तर परदेशात ही स्पर्धा होऊ शकते, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता परदेशात आयपीएल खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे. आयपीएल खेळवण्यासाठी काही देशांनी प्रस्तावही पाठवल्याचे ऐकिवात आहे. त्यामुळे आता कोणत्या देशामध्ये आयपीएल होऊ शकते, हे पाहा…

आयपीएल परदेशात खेळवण्याचे बीसीसीआयचे संकेत…
भारतामध्ये आयपीएल खेळवणे खेळाडूंसाठी सुरक्षित नसेल तर ही स्पर्धा आता परदेशात खेळवली जाऊ शकते, असे संकेत बीसीसीआयने दिले आहेत.
२००९ साली आयपीएल दक्षिण आफ्रिकेत झाली होती…
बीसीसीआयने आयपीएल २००९ साली दक्षिण आफ्रिकेत खेळवली होती. या स्पर्धेला चांगला प्रतिसादही मिळाला होता.
२०१४ साली युएईमध्ये स्पर्धा खेळवली होती…
२०१४ साली आयपीएल संयुक्त अमिरातीमध्येही खेळवली गेली होती. या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सने जेतेपद पटकावले होते.
या दोन देशांचा विचार करू शकते बीसीसीआय…
या वर्षी भारताला दोन देशांनी आयपीएल खेळवण्याचे प्रस्ताव दिले आहेत. जर भारतात आयपीएल झाली नाही तर बीसीसीआय या प्रस्तावांवर विचार करू शकते.
श्रीलंकेने दिला होता पहिला प्रस्ताव आयपीएल खेळवण्याचा पहिला प्रस्ताव बीसीसीआयला श्रीलंकेने दिला होता. यावर बीसीसीआय विचार करत आहे.
श्रीलंकेतील करोना बाधितांच्या संख्येत वाढ…
गेल्या कही दिवसांमध्ये श्रीलंकेत करोना बाधितांची संख्या वाढत आहे, त्यामुळे श्रीलंकेत आयपीएल खेळवायची की नाही, यासाठी बीसीसीआय श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाबरोबर चर्चा करणार आहे.
युएईला मिळू शकते पसंती, कारण…
आयपीएल खेळवण्यासाठी दुसरा प्रस्ताव संयुक्त अरब अमिरातीने दिला आहे. जर श्रीलंकेत आयपीएल होऊ शकली नाही तर बीससीआयकडे हा सर्वात चांगला पर्याय असेल. कारण २०१४ साली संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएल खेळवली गेली होती. त्यामुळे त्यांना आयपीएल आयोजित करण्याचा चांगला अनुभव आहे.

अधिक वाचा  सोलापूरात थेट आत्ता मोदीच मैदानात; लढत कडवी होताच 3 जागी सातपुते, निंबाळकरांसाठी ही खास मोहीम