मुंबई : तरुणांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांच्या फोनमध्ये व्हॉट्सअॅप (Whatsapp) असतंच. भारतात सर्वाधिक संवादासाठी वापरलं जाणार माध्याम म्हणजे Whatsapp. अगदी घरच्या ग्रूपपासून ते कामाच्या मिटिंगपर्यंत सगळे मेसेज आणि फोन त्यावर होतात. 10 वर्षांपूर्वी आलेल्या या मेसेजिंक अॅपनं प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हक्काचं स्थान मिळवलं. सध्या स्वदेशी वस्तूंचा वापर आणि स्वदेशी अॅपची चर्चाही याच Whatsapp वर रंगताना पाहायला मिळत आहे.
Whatsappच्या तोडीचं स्वदेशी मेसेजिंग अॅप तयार करण्यात आलं आहे. भारत मेसेंजर (bharat messenger) हे अॅप व्हॉट्सअॅपसारखंच काम करणार आहे. या अॅपमार्फत तुम्ही मेसेज आणि व्हिडीओ कॉलिंग करू शकता. यासाठी दोन्ही व्यक्ती bharat messenger वर असणं आवश्यक आहे.
सध्या कोरोना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या भारताविरोधी चीनच्या कारनाम्यांमुळे सोनम वांगचुक यांनी चीनी वस्तू न वापरण्याचं आवाहन केलं होतं. फोनमधील चीनी अॅप ते घरातील वस्तूं असो त्यावर बंदी घालावी असं आवाहन त्यांनी केल्यानंतर देशात स्वदेशी असलेल्या भारत मेसेंजरची चर्चा सुरू झाली आहे.
हे अॅप प्ले स्टोरवर उपलब्ध आहे. हे अॅप whatsapp सारखंच कार्य करतं. 51 MB चं हे अॅप फोनमध्ये डाऊनलोड करावं त्यानंतर मोबाईनंबर अपलोड करून व्हेरिफिकेशन करावं. हे ऍप एक लाखाहून अधिक युझर्सने डाउनलोड केलेले आहे.

अधिक वाचा  लातूरच्या विकासासाठी ‘वाढपी हा आपल्या हक्काचा असला पाहिजे हक्काचा वाढपी दिल्लीत पाठवू…’ देशमुख