पुणे : राज्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पाचवा टप्पा अवलंबवण्यात आला आहे. केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्र सरकारकडूनही राज्यासाठी नियमावली जाहीर करण्यात आली. राज्याच्या मुख्य सचिवांनी ही नियमावली जाहीर केली. यानुसार आता पुणेकरांना मॉर्निंग वॉक, जॉगिंगसाठी घराबाहेर मोकळ्या हवेत जाता येणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. अशात पुण्यातही लॉकडाऊन 5.0 साठी पुणे मनपा आयुक्त आज नव्याने ऑर्डर काढणार आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणेकर आता नियमांचं आणि अटींचं पालन करून बाहेर पडू शकतात. उद्याने, मैदाने यावर मोकळेपणाने त्यांना फिरता येणार आहे. यासाठी प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील 150 उद्याने मंगळवार 2 जून पासून खुली व्हायची शक्यता आहे. सकाळी 5 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत उद्यानं उघडी असतील असं सांगण्यात आलं आहे. पण यावेळी मास्क लावणे आवश्यक असेल. मात्र, लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांना उद्यानात प्रवेशबंदी असणार आहे.
नव्या आदेशानुसार आता प्रतिबंधित क्षेञातील अत्यावश्यक दुकानेही 4 तासांसाठी उघडणार येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. गेल्या 21 तारखेपासून प्रतिबंधित क्षेञातील दुकानं बंद आहेत. ती उघण्याची परवाणगी जरी देण्यात आली असली तरी त्यासाठी वेगळे नियम आणि अटी असणार आहेत. काही ठराविक वेळेतच ही दुकानं उघण्यासाठी परवाणगी देण्यात येणार आहेत.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात प्रतिबंधित क्षेञातील जीवनावश्यक किट वाटपावर पालिकेचा 100 कोटींचा खर्च झाला आहे. पेशंट वाढल्यानं प्रतिबंधित क्षेञात धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सूट देण्याऐवजी काही नियम आणखी कठोर करण्यावर भर देणं आवश्यक आहे अशी माहिती मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी न्यूज18 लोकमतला दिली आहे.

अधिक वाचा  इकडे ईडीची नोटीस, तिकडे लोकसभेचे तिकीट, अमोल किर्तीकर अखेर मैदानात