पुणे – करोना संसर्ग झालेल्या व्यक्तीची 14 दिवसानंतरच्या दोन्ही चाचण्या निगेटीव्ह आल्यावर त्याला घरी पाठविले जाते. मात्र, आतापर्यंत ठणठणीत बरे झालेल्यांपैकी 35 रुग्णांची 14 व्या दिवशी चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे या सर्वांना आणखी सात दिवस उपचार देण्यात आले. 21 व्या दिवशी त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यावर त्यांना घरी सोडण्यात आले.
शहरात चार हजारांवर करोना बाधितांची नोंद झाली आहे. त्यादरम्यान पुण्यातील काही रुग्ण डॉ. नायडू रुग्णालयात उपचार घेत होते. त्यावेळी केंद्र सरकारच्या धोरणानुसार 14 दिवसानंतर डिस्चार्ज देण्यात येत हाता. साधारणत: 12 मे पूर्वी रुग्णालयातील 35 जणांचा कालावधी संपुष्टात येत असल्याने 14 व्या दिवशी त्यांची चाचणी घेण्यात आली. ती पॉझिटिव्ह आली.
पुन्हा दुसऱ्या दिवशी चाचणी घेतली असता ती सुद्धा पॉझिटिव्ह आली. त्यामुळे करोनाच्या विषाणूचा त्या रुग्णांच्या शरिरात अद्याप प्रादुर्भाव असल्याचे 35 रुग्णांची 14व्या दिवशीची करोना चाचणीही पॉझटिव्ह दिसून आले. त्यामुळे आणखी सात दिवस त्या रुग्णांना आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले. त्यानंतर 21 व्या दिवशी चाचणी केली असता निगेटिव्ह आली. त्यानंतर आम्ही त्यांना डिस्चार्ज केले, अशी माहिती नायडू रुग्णालयाचे प्रमुख आणि सहायक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी दिली.
…हे सारे मार्गदर्शक सूचनांनुसारच
ससून रुग्णालयाच्या सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. सुवर्णा जोशी म्हणाल्या, ‘पूर्वी 14 दिवसांनंतर चाचण्या झाल्या, की डिस्चार्ज दिला जात होता. आता त्या धोरणात बदल केला आहे. ‘दहाव्या दिवशी चाचणी न करता डिस्चार्ज करा’ असे सरकारने सांगितले. म्हणजेच सातव्या दिवसापासून त्या व्यक्तीला लक्षणे नसल्यास त्याची चाचणी करण्याची गरज नाही, असे मार्गदर्शक सूचनांमध्ये म्हटले आहे. त्या 35 जणांमध्ये रोग प्रतिकारशक्ती चांगली नसावी. त्यामुळे 14 दिवसांपर्यंत त्यांच्या शरिरातील विषाणू बाहेर पडू शकला नाही. त्याला कालावधी अधिक लागला ही बाब दुर्मीळ असली, तरी फार गंभीर नाही. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण अधिक होत असताना त्यापैकी एक टक्‍क्‍यापेक्षाही कमी एवढे प्रमाण या प्रकाराचे असू शकते.’

अधिक वाचा  निवडणुकीआधीच भाजपने उधळला गुलाल; 5 उमेदवार बिनविरोध 197 अर्ज त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट