मुंबई: राज्यात करोनाचा कहर कायम आहे. राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या आज २७ हजार ५२४ वर पोहचली आहे. आज १६०२ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे तर ५१२ करोना बाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ६०५९ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या प्रत्यक्षात २० हजार ४४६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ४० हजार १४५ नमुन्यांपैकी २ लाख १२ हजार ६२१ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २७ हजार ५२४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३ लाख १५ हजार ६८६ लोक होम क्वारंटाइनमध्ये असून १५ हजार ४६५ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज राज्यात ४४ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृतांची संख्या १०१९ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईमधील २५, नवी मुंबईत १०, पुण्यात ५,औरंगाबाद शहरात २, पनवेलमध्ये १ तर कल्याण डोंबिवलीमध्ये १ मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत आज नमूद करण्यात आलेले मृत्यू दि. १४ एप्रिल ते १४ मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूंपैकी ३१ पुरुष तर १३ महिला आहेत. ४४ मृतांमध्ये ६० वर्षे किंवा त्यावरील २१ रुग्ण आहेत तर २० रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत तर ३ जण ४० वर्षांखालील आहेत. या ४४ रुग्णांपैकी ३४ जणांमध्ये ( ७७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १५१२ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४ हजार २५३ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ५९.०४ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका: १६,७३८ (६२१)
ठाणे: १६६ (३)
ठाणे मनपा: १२१५ (११)
नवी मुंबई मनपा: १११३ (१४)
कल्याण डोंबिवली मनपा: ४२४ (४)
उल्हासनगर मनपा: ८२
भिवंडी निजामपूर मनपा: ३९ (२)
मीरा भाईंदर मनपा: २४८ (२)

अधिक वाचा  महायुतीत जागावाटप गुंता असताना भाजपच्या मात्र सुस्साट 23 जागांचे वाटप शिंदे-अजितदादांच्या पदरी निराशाच?

पालघर: ४२ (२)
वसई विरार मनपा: २९५ (११)
रायगड: १६६ (२)
पनवेल मनपा: १६१ (९)
ठाणे मंडळ एकूण: २०,६८९ (६८१)

नाशिक: ९८
नाशिक मनपा: ६०
मालेगाव मनपा: ६४९ (३४)
अहमदनगर: ५५ (३)
अहमदनगर मनपा: १५
धुळे: ९ (२)
धुळे मनपा: ६२ (४)
जळगाव: १७१ (२२)

जळगाव मनपा: ५२ (४)
नंदूरबार: २२ (२)
नाशिक मंडळ एकूण: ११९३ (७१)

पुणे: १८२ (५)
पुणे मनपा: २९७७ (१६६)
पिंपरी चिंचवड मनपा: १५५ (४)
सोलापूर: ९ (१)
सोलापूर मनपा: ३३५ (२०)
सातारा: १२५ (२)
पुणे मंडळ एकूण: ३७८३ (१९८)

अधिक वाचा  भाजप उमेदवाराच्या गाडीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मंत्र्यांसमोरच उमेदवार-पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडिओ व्हायरल

कोल्हापूर: १९ (१)
कोल्हापूर मनपा: ६

सांगली: ३६
सांगली मिरज कुपवाड मनपा: ७ (१)
सिंधुदुर्ग: ७
रत्नागिरी: ८३ (३)
कोल्हापूर मंडळ एकूण: १५८ (५)

औरंगाबाद:९५
औरंगाबाद मनपा: ६२१ (१९)
जालना: २०
हिंगोली: ६१
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ७९९ (२०)

लातूर: ३२ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ४
बीड: १
नांदेड: ५
नांदेड मनपा: ५२ (४)
लातूर मंडळ एकूण: ९४ (५)

अकोला: १८ (१)
अकोला मनपा: १९० (११)
अमरावती: ५ (२)
अमरावती मनपा: ८७ (११)
यवतमाळ: ९९
बुलढाणा: २६ (१)
वाशिम: ३

अधिक वाचा  ‘बडे मिया छोटे मिया’ च्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अक्षयनं टायगरला दिला ‘हा’ सल्ला, ऐकताच सगळ्यांना हसू अनावर

अकोला मंडळ एकूण: ४२८ (२६)

नागपूर: २
नागपूर मनपा: ३२९ (२)
वर्धा: १ (१)
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ४
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: ३३९ (३)

इतर राज्ये: ४१ (१०) ; एकूण: २७ हजार ५२४ (१०१९)