मुंबई- करोना व्हायरसच्या विळख्यात अख्खा देश अडकला आहे. देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी मदतीचा हात पुढे केला. दरम्यान, दिग्दर्शकत सुभाष घई यांनी ट्वीट करत नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला. आपल्या ट्वीटमध्ये घई यांनी सद्य स्थितीचा उल्लेख करत मंदिरांनी सरकारकडे स्वतःहून त्यांना मिळालेलं सोनं का देऊ नये असा प्रश्न विचारला.
सुभाष घई यांचं ट्वीट-
दिग्दर्शकाने ट्वीटमध्ये म्हटलं की, ‘आपल्या देवांच्या मंदिरांकडे पोहोचण्याची ही योग्य वेळ नाही का? सोन्याने संपन्न अशा मंदिरांनी सरकारला आपणहून त्यांच्याकडचं ९० टक्के सोनं दिलं पाहिजे. त्यांना हे सोनं देवाच्या नावाने लोकांकडूनच मिळालं आहे ना?’
लोकांच्या आल्या वेगवेगळ्या रिअॅक्शन-
अनेकांनी सुभाष घई यांचं समर्थन केलं आणि चर्च, मस्जिदमधूनही अशा मदतीची अपेक्षा व्यक्त केली. तर काही लोकांनी या ट्वीटवरून घई यांच्यावर निशाणा साधला.
सिनेसृष्टीचं झालं मोठं नुकसान-
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सुभाष घई म्हणाले होते की, लॉकडाउनमुळे सिनेसृष्टीचं फार मोठं नुकसान झालं आहे. ‘मी ही गोष्ट नाकारू शकत नाही की, लॉकडाउनमुळे आर्थिक रुपात आमचं मोठं नुकसान केलं आहे.’
सर्व सुरळीत होण्याची प्रतीक्षा-
सुभाष घई पुढे म्हणाले की, ‘आमच्यासाठी हा मोठा झटका होता. पण आम्ही एकत्रित या विरुद्ध लढू. सर्व सुरळीत होण्याची आम्ही प्रतीक्षा करू. आम्ही पुन्हा एकदा सिनेमा प्रदर्शित करू.’

अधिक वाचा  राजस्थान कोटामध्ये चाललंय काय? NEET मानसिक तणावात 3 महिन्यांत 8 विद्यार्थिनीने थेट जीवन संपवलं