नवी दिल्ली : उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी सोमवारी लॉकडाऊनबाबत मोठं विधान केलं आहे. सध्या देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. रोजंदारीवरील काम बंद असल्याने त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.
यावेळी आनंद महिंद्रा यांनी ट्विट केलं आहे. त्या ते म्हणाले की, जर जास्त काळासाठी लॉकडाऊन वाढवला गेला तर देशाच्या अर्थव्यवस्थेला आत्मघातकी ठरेल. त्यांच्या शब्दात सांगायचे झाले तर लॉकडाऊन वाढवला तर देशासाठी ही ‘आर्थिक हारा-किरी’ ठरू शकते. ते पुढे म्हणाले की लॉकडाऊनमुळे लाखो लोकांचा जीव वाचला आहे, मात्र जर हा कालावधी अधिक वाढवला तर समाजातील निम्न स्तरातील लोकांसाठी मोठं संकट निर्माण करू शकतो. पुढे ते असेही म्हणाले की आपल्याला कोरोनासह जगावं लागणार आहे. हा काही टुरिस्ट व्हिसा घेऊन आलेला नाही ज्याची एक्सपायरी डेट आहे.
जपानमधील युद्धात पराभव झालेल्या योद्ध्यांना ताब्यात घेतले जाऊ नये यासाठी ते आपल्याच पोटात चाकू खुपसून आत्महत्या करण्याच्या प्रथेला हाराकीरी म्हणतात.
आनंद महिंद्रा यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. त्यामध्ये ते म्हणतात की, गेल्या काही दिवसात ग्राफच्या तेजीवर अंकुश लावला असतानाही कोरोनाच्या संख्येमध्ये वाढ आहे. आपल्या देशातील लोकसंख्या आणि इतर देशातील रुग्णसंख्या पाहता अधिक चाचण्यांची गरज आहे. आपण हा ग्राफ हळूहळू सुधारले. याचा अर्थ असा नाही की लॉकडाऊनचा उपयोग झाला नाही.