नवी दिल्ली : भारतात कोरोनाचा प्रसार वेगानं होत आहे. सध्या भारतातील कोरोनाबाधितांच्या संख्या 70 हजारहून अधिक आहे. तर, 2 हजार 293 लोकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत भारतात 3604 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. तर, 82 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र अशा स्थितीतही भारतासाठी एक दिलासादायक बातमी आहे.
आरोग्य विभागानं जारी केलेल्या आकडेवाडीनुसार भारतासाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. शनिवार आणि रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी लोकांचा मृत्यू झाला. शनिवारी आणि रविवारी कोरोनामुळं 100हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. मात्र सोमवारी हा आकडा कमी झाला. सोमवारी 82 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त म्हणजे 36 लोकांचा मृत्यू झाला.याचबरोबर महाराष्ट्रातील मृतांचा आकडा 868 झाला आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाचा जास्त प्रभाव आहे. मुंबईत कोरोनामुळं आतापर्यंत 528 लोकांचा मृत्यू झाला आहे.
एवढेच नाही राजधानी दिल्लीतून दिलासादायक बातमी आहे. सोमवारी दिल्लीत कोरोनामुळं एकाचाही मृत्यू झाला नाही. तर 310 नवीन प्रकरणं समोर आली. यासह आता दिल्लीतील कोरोनाबाधितांच्या संख्या 7233 झाली आहे. संपूर्ण देशाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, सोमवारी देशात कोरोना संक्रमितांची संख्या कमी होती. रविवारी 4307 रेकॉर्ड ब्रेक रुग्ण सापडले होते, तर सोमवारी 3607 रुग्ण.
महाराष्ट्रातल्या स्थितीत सुधार
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील परिस्थिती सुधारताना दिसत आहे. राज्यात रविवारच्या तुलनेत सोमवारी कमी प्रकरणं समोर आली. रविवारी 1276 नवीन प्रकरणं आढळून आली होती तर, सोमवारी हा आकडा 1276 होता. गेल्या 6 दिवसांनंतर पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा कमी झाला आहे.

अधिक वाचा  बिग बॉसच्या घरात सगळ्यांना गुलीगत धोका