पुणे: पुण्यातील गोखलेनगर भागातील एका सोसायटीत असलेले किराणा माल विक्रीचे दुकानाचे कुलुप तोडून चोरट्यांनी गल्लयातील ५५ हजारांची रोकड आणि सुकामेवा असा ९७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेल्वे मार्गावरील दुर्घटना टळली
याबाबत सचिन गोयल (वय ४२,रा. बाणेर) यांनी तक्रार दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोयल यांचे गोखलेनगर भागातील निसर्ग हाऊसिंग सोसायटीत शीतल ट्रेडिंग नावाचे किराणा माल विक्रीचे दुकान आहे. चार दिवसांपूर्वी गोयल यांनी रात्री दुकान बंद केले. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. गल्ल्यातील ५५ हजारांची रोकड, दुकानातील सुकामेवा असा ९७ हजार २०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबविला. याप्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण हे अधिक तपास करत आहेत.