पुणे : राज्यात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अशात पुण्यात पालिका आयुक्तांनी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात फिजिकल डिस्टंसिंगचं पालन न सोमवारपासून पुण्यात नियम कठोर करण्यात आले आहेत. प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा सोडल्या तर पुण्यात सर्व दुकानांवर बंदी घालण्यात आली आहे.
रेड झोन असलेल्या पुण्यामध्ये एकूण 69 कंटेनमेंट झोन्स आहेत. या भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे दवाखाने वगळता इतर दुकाने बंद राहणार असल्याचा निर्णय आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. भाजीपाला, दूध हे पोलिसांच्या सहकार्यानं मोकळ्या मैदानात द्यायचा विचार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुणेकरांना सोमवारपासून कठोर नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे.
आपत्कालीन सेवा व जीवनावश्यक वस्तूंच्या सेवा व पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सकाळी 10.00 ते दुपारी 2.00 पर्यंत दुकानं उघडी राहतील असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, यावेळी सोशल डिस्टंसिंग आणि मास्क वापरणे अशा महत्त्वाच्या सुचनांचं पालन करणं अनिवार्य असल्याचंही सांगण्यात आलं आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन झाले नाही तर कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.