पुणे : पुण्यात आतापर्यंतच्या सर्वांत लहान कोरोना रुग्णाचा मृत्यू नोंदला गेला आहे. तेरा महिन्यांची मुलगी Coronavirus वर ससून रुग्णालयात उपचार गेत होती. ही तान्ही मुलगी अगोदरच कुपोषित होती आणि तिची प्रकृती गंभीर होती. त्यामुळे तिनं उपचारांना दाद दिली नाही आणि ससून रुग्णालयात तिचा मृत्यू झाला.
पुण्याच्या वारजे परिसरात राहणाऱ्या 13 महिन्याच्या मुलीचा मृत्यू रविवारी झाला. इतर काही प्रकृतीच्या तक्रारींबरोबर रक्तक्षयही (megaloblastic anaemia with sepsis)झाला होता, असं समजतं. 4 मेपासून तिच्यावर उपचार सुरू होते. याशिवाय रविवारी पुण्यात पाच जणांचा मृत्यू झाला.
आतापर्यंत पुण्यात 2,857 कोरोनारुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 156 जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात 125 जणांचा COVID-19 चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पुण्यात रविवारी झालेल्या मृत्यूंमध्ये येरवडा कारागृहातील एका कैद्याचा समावेश आहे.
पुण्यात कोरोनारुग्ण नसलेल्या भागात आता संचारबंदी शिथिल केली आहे. पण प्रतिबंधित क्षेत्रातले निर्बंध वाढवले आहेत. रेड झोन असलेल्या पुण्यामध्ये एकूण 69 कंटेनमेंट झोन्स आहेत. या भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे दवाखाने वगळता इतर दुकाने बंद राहणार असल्याचा निर्णय आयुक्तांकडून घेण्यात आला आहे. भाजीपाला, दूध हे पोलिसांच्या सहकार्यानं मोकळ्या मैदानात द्यायचा विचार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी पुणेकरांना सोमवारपासून कठोर नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे.

अधिक वाचा  हरियाणातील निकालात मोठा ट्विस्ट… बहुमताकडे गेलेली काँग्रेस अचानक पिछाडीवर, भाजप आघाडीवर; काय घडतंय?