कोथरुड – बावधन प्रभागातील नागरिकांसाठी मदत….. आणि काळजीसाठी कायमच प्रभागातील सर्वांना अपेक्षीत नाव म्हणजे किरण दगडे पाटिल. जागतिक महामारी कोरोनाची चाहूल लागताच पुणे शहरात लागल्यानंतर दिवस- रात्र फक्त प्रभागतील नागरिकांची काळजीचा वसा घेेत प्रभागात पुुणे शहरातील पहिली सोडीयम क्लोराईड ची फवारणी करण्यास सुरुवात केली. अन प्रभागाच्या कोरोना लढाईला सुरुवात केली.
दक्षता अन् पुर्वतयारी…
कोरोनाची लक्षणे सुरु झाल्यानंतर पुणे शहरात सर्वात अगोदर कोथरुड – बावधन सोडीयम क्लोराईडची फवारणी करण्यास सुरुवात केली.
सुरुवातीला किरण दगडे यांच्या या उपक्रमांबाबत अनेकांना टिका- टिपण्णी करण्याचे काम केले; परंतु याचे चांगले परिणाम दिसल्यानंतर अनेकांकडून याची पुनावृती करण्याचेही काम केले. कोरोनाची चाहुल लागल्यावर कोथरुड- बावधन भागातील सर्व इमारतीवर पुणे महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या वतीने सोडीयम क्लोराईडची फवारणी करुन घेवून सर्व परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली. बावधन खुर्द, बावधन बु।।, कोथरुड डेपो भागातील सर्व इमारतींमध्ये फवारणी केल्यानंतर या भागातील गोरगरिबांच्या अडचणीत मदत करण्यास सुरुवात केली. शास्त्रीनगर, लोकमान्य कॉलनी, गादिया इस्टेट, मोकाटेनगरसह अन्य नागरिकांना 25 हजार लोकांच्या अन्यधान्याची सोय केली.
श्रमिकांना हक्काचा आधार ……
लॉकडाऊन हा शब्दच ऐकताच प्रभागातील अनेक गोर गरीब लोकाच्या पाया खालची वाळू सरकुन जाण्यासारखा होता. एक तर हातावर पोट अन धुणी-भांडी करुन जगणा-यांना तर आभाळ डोक्यावर कोसळल्याची जाणीव झाली. आपल्या मुळशी तालुक्यातील बांधवांना हक्काचे दोन वेळचे जेवण देण्याचा ध्यास घेत तालुक्यातील भुमिपुत्राच्या घरातील चूल पेटती ठेवण्याचे काम केले. आपल्या बांधवांना शिधा वाटपाची सुरुवात केल्यानंतर लोकांची अमाप गर्दी झाल्यानंतर खरी दाहकता जाणवली.
प्रभागातील मध्यमवर्गीय लोकांची किमान भुक भागवण्याची शक्यता तरी होती. पन घरात अन्नाची चणचण अन बाहेर पोलीसांची काठी यामध्ये आपल्या मुलांना दोन वेळचे अन्न कसे द्यायचे याची शंका होती. दिवसभरात आशेने अनेकांचे फोन येत असल्याने किरण दगडे यांनी या लोकांची भुक भागवण्याचा संकल्प करत मोकाटेनगर,शास्त्रीनगर, गादिया इस्टेट, लोकमान्यनगर, बावधन खुर्द, बावधन बु।।, कोकाटेवस्ती,पाण्याची टाकी भागातील लोकांना शिधा वाटप सुरु केले. घरात लोकांना अन्नधान्याची सोय झाल्याने या भागातील करोना समूह संपर्काची भिती कमी होण्याच्या आशा निर्माण झाल्या.
प्रभागातील अनेकांचा रिक्षा हाच एकमेव हक्काचा व्यवसाय असल्याने या कोरोना लॉकडाउन ने या लोकांचा जगण्याचाच आधार हिसकावलेल्या या लोकांना घरातील चूल बंद पडण्याची भिती वाटत होती. रिक्षा संघटनाची मागणी वाढल्याने घरपोच शिधा देण्यात आला. नागरिकांची मागणी वाढत असल्याने पुन्हा शिधावाटप सुरु केले असुन अजून अनेकांकडून प्रचंड मागणी होत आहे.
दक्षता रक्षकाची अन् तपासणी जनतेची……
प्रभात कोरोना रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणे आणि डॉक्टर, पोलीस या कोराना योद्धे यांना सुरक्षित करण्यासाठी परिसरातील सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांना PPE कीटचे वाटप करण्यात आले. सामान्य नागरिकांची वर्दळ असलेल्या खाजगी तपासणी करणारे यांनाही किरण दगडे यांच्यावतीने कोरोना रक्षणार्थ सेवा सुविधा देण्यात आली. त्यानंतर प्रभागातील लोकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी फिरते जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून तपासणी पथक तयार करुन या लोकांना औषध देण्याची सोय केली. त्यानंतर पुणे महानगरपालिकेच्या तपासणी पथकाकडून संपुर्ण प्रभागातील लोकांची तपासणी करण्यात आली.
पुणे महानगरपालिकेच्या सोयी- सुविधा प्रमाणेच बावधन ग्रामपंचायत भागातील नागरिकांनाही सर्व इमारतींमध्ये फवारणी अन् शिधावाटप करुन गावातील लोकांनाही कोरानापासून वाचवण्याचे काम करत आहेत. बावधन ग्रामपंचायतीच्या भागातील नागरिकांना मुळशी तालुक्याच्या एका कोप-यात एकाकी असलेल्या गरजवंताला मदत करत पियुषाताई किरण दगडे सुध्दा गरजवंतांची माय झाल्या आहेत.