करोना विषाणूच्या सावटामुळे सध्या देशात लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात प्रत्येक जण घरात राहून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेत आहेत. मात्र या साऱ्यामध्ये पोलीस आणि अन्य कर्मचारी दिवसरात्र केवळ देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत. त्यामुळेच ‘या योद्धांच्या सन्मानासाठी देशातील प्रत्येक नागरिकाने सोशल मीडिया अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवा’, असं आवाहन राज्याचे गृहमंत्री यांनी केलं होतं. त्यानुसार अभिनेता सलमान खानने त्याच्या डीपीमध्ये बदल केला आहे.
सध्या संपूर्ण देश करोना विषाणूच्या त्रासाने हैराण झाला आहे. यामध्ये केवळ देशाच्या जनतेसाठी पोलीस दिवसरात्र मेहनत करत आहेत. त्यातच महाराष्ट्र पोलीसदेखील अहोरात्र काम करत असून २४ तास त्यांची सेवा बजावत आहे. एकीकडे सामान्य नागरिक घरात राहून स्वत:ची काळजी घेत आहेत. तर घराबाहेर या नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस तैनात आहेत. त्यामुळे सलमानने त्यांचे आभार मानण्यासाठी त्याचं फेसबुक प्रोफाइल बदललं आहे.
काही दिवसापूर्वी “सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा”, असं ट्विट राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलं होतं. त्यांच्या या आवाहनानंतर अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरील डीपी बदलल आहे.
सदैव देशसेवेस कर्तव्यतत्पर असणारे पोलीस एकटे नाहीत हे अधोरेखित करण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मी फेसबुक, ट्विटर व इन्स्टाच्या अकाऊंटवर डीपी म्हणून महाराष्ट्र पोलिसांचा लोगो ठेवणार आहे. तुम्हीही आपला डीपी ठेवून पोलीस बांधवांच्या सन्मानात सहभागी व्हा. #पोलिसांनासाथ_कोरोनावरमात pic.twitter.com/bLx9psUXAD
सलमानने त्याच्या प्रोफाइलमध्ये महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावला आहे. फेसबुकप्रमाणेच त्याने इन्स्टाग्राम आणि ट्विटरचं प्रोफाइलही बदललं आहे. त्यामुळे सध्या चाहते त्याचं कौतुक करत आहेत. सलमानप्रमाणेच रितेश देशमुख, कतरिना कैफ,करण जोहर या सारख्या कलाकारांनीही त्यांचे सोशल मीडियावरील प्रोफाइल बदलले आहेत.

अधिक वाचा  कर्वे रस्ता विसर्जन मिरवणूक 16 तासाने संपली; रोमांचक रोषणाई, आकर्षक सजावट, कल्पक देखावे यंदाचे वैशिष्ठ