पुणे : पुणे शहरातील एमपीएसी आणि युपीएससी परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी थोड्याच वेळात गावाकडे रवाना होणार आहे. या 44 विद्यार्थ्यांची जाण्याची सोय मनसेकडून करण्यात आली आहे. जळगावला विद्यार्थ्यांची एक बस रवाना होणार आहे. ही बस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बस पाठवली जाणार आहे.
पुण्यातून बाहेर जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कंटेनमेंट झोन व्यतिरिक्तच्या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन झाल्यापासून पुण्यात अडकून पडलेल्या या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुण्यातून कुणासाठी आहे मोफत बस सेवा?
शासन आदेशानुसार देण्यात येणारी मोफत बस प्रवासाची सुविधा केवळ दोन परिस्थितीतच लागू राहील, असं शासनाकडून सांगण्यात आलं आहे. इतर राज्यातील जे मजूर व इतर नागरिक महाराष्ट्रात विविध ठिकाणी अडकलेले असतील त्यांना महाराष्ट्र राज्याच्या सीमेपर्यंत घेऊन जाणे व महाराष्ट्रातील रहिवासी असलेले मजूर व इतर व्यक्ती जे इतर राज्यांतून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत आलेले आहेत, त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातील जिल्ह्यापर्यंत पोहचविण्याकरताच मोफत बससेवा देण्यात येणार आहे.

अधिक वाचा  गणेशोत्सव सुरू असताना ‘सुप्रीम’ च्या निकालाने मोठा दिलासा; 30 ची मर्यादा हरितलवादाच्या आदेशाला स्थगिती