नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमधले दहशतद्यांचे हल्ले आणि हंदवाडा एन्काउंटरमुळे पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती वाटते आहे. हंदवाडा एन्काउंटरमध्ये भारताचे एका कर्नलसह 4 जवान शहीद झाले होते. भारत त्याचा बदला घेऊ शकतो अशी भीती पाकिस्तानला आहे. भारताने या आधी दोन वेळा सर्जिकल स्ट्राईक केले आहेत. त्यामुळे सीमेवर लढाऊ विमानांची गस्त पाकिस्तानने सुरू केल्याची माहिती ANIने दिली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा पथकांवर हल्ले केले आहेत. त्यात हंदवाडाचा हल्ला हा सर्वात मोठा होता. त्यानंतर रियाज नायकू या हिजबुलच्या कमांडरचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. भारताचे 5 जवान शहीद झाल्याने पुन्हा सर्जिकल स्ट्राईक होऊ शकते असं पाकिस्तानच्या लष्कराला वाटतं.
त्यातूनच पाकिस्तानने अत्याधुनिक F-16 आणि JF-17 ही अत्याधुनिक लढाऊ विमानं सीवेजवळ तैनात केली असून त्यांची गस्तही सुरू असल्याचं दिसून आलंय. भारतीय लष्कर आणि गुप्तचर संस्था सीमेजवळ घडणाऱ्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.
भारताने पहिल्यांदा पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. तर दुसऱ्यांदा लढाऊ विमानांनी पाकिस्तानात खोलवर जाऊन बालाकोटमधला दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर उद्धवस्त केलं होतं.

अधिक वाचा  निर्मला सीतारमन सलग आठवा ‘अर्थसंकल्प’ सादर करणार ; ३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन