मुंबई: आंतरराष्टीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर तो निर्णय मागे घेऊन पुन्हा मैदानात परतलेले अनेक खेळाडू आहेत. यात पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान, जावेद मियाँदाद, केव्हिन पिटरसन, कार्ल हुपर हे खेळाडू निवृत्ती घेतल्यानंतर पुन्हा मोठ्या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहेत. भारतीय क्रिकेटमध्ये ही गोष्ट शक्य नसते. पण भारताच्या एका अष्ठपैलू खेळाडूने पुन्हा क्रिकेटमध्ये परतण्याची तयारी केली आहे आहे. पण त्यासाठी त्याने काही अटी ठेवल्या आहेत.
भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने शनिवारी निवृत्ती मागे घेण्याची तयारी दाखवली आहे. पण यासाठी त्याला बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांकडून आश्वासन हवे आहे. जर बीसीसीआयने पुन्हा क्रिकेटमध्ये परतण्यासाठी निश्चित कालावधी सांगितला तर तो पुन्हा क्रिकेट खेळण्यास तयार आहे.
पठाणने या वर्षी जानेवारी महिन्यात १६ वर्ष क्रिकेट करिअरमधून निवृत्ती घेतली होती. जर निवड समितीने संघात घेण्याचे आश्वासन दिले आणि तयारीसाठी एक वर्षाचा कालावधी दिला तर मी पुन्हा खेळण्यास तयार असल्याचे पठाणने सांगितले.
सुरेश रैनासोबत इंस्टाग्राम लाइव्ह चॅटवर बोलताना इरफान म्हणाला, संवाद फार म्हत्त्वाचा आहे. जर बीसीसीआयचे अधिकारी आले आणि त्यांनी तयारीसाठी एक वर्ष देणार असल्याचे सांगून संघात घेण्याची तयारी दाखवली तर मी भरपूर मेहनत घेईन. पण हे बोलणार कोण?
इतक नव्हे तर इरफान म्हणाला, जर ते (बीसीसीआय) म्हणाले सुरेश रैना तुमच्याकडे सहा महिने आहेत. वर्ल्ड कप आहे. तर तुम्ही विचार कराल की, चांगली कामगिरी करू संघात निवड व्हावी. यावर रैना म्हणाला, नक्कीच असा विचार नक्की करू.
इरफान पठणाने २००३ साली १९व्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले होते. पण गेल्या काही वर्षापासून त्याला संधी मिळाली नसल्यामुळे त्याने निवृत्ती घेतील. रैनासोबतच्या चॅटमध्ये इरफानने बीसीसीआयने खेळाडूंना परदेशातील लीग स्पर्धेत खेळण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी देखील केली.

अधिक वाचा  …..या प्रश्नावर बैठकीसाठी वेळ मिळावी,” राष्ट्रवादी नेते शरद पवार यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर पत्र