पुणे, 8 मे : राज्यात कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत मुंबई, पुण्यात (Mumbai- Pune) कोरोनाचा (Covid -19) धोका आहे. आज पुण्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 885 इतकी झाली आहे. येत्या काळात ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काल पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत मोठा खुलासा केला होता.
पुण्यात 31 मे पर्यंत आकडा 9000 वर जाण्याची शक्यता आहे, असं पुणे मनपा आयुक्त गायकवाड म्हणाले होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी पुणे पालिकेने तब्बल 9 हजार बेड्सचं तात्पुरतं कोविड आयसोलेशन सेंटर उभारणार असल्याचं सांगितलं आहे. बालेवाडी क्रीडा संकुलातील विविध इनडोअर हॉल्समध्ये तात्पुरते कोविड विलगीकरण केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी तातडीने तात्पुरत्या बेड्सची खरेदी करण्यात येणार आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे.
रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पालिकेने पूर्वतयारी सुरू केली आहे. आज पुणे विभागातील 837 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या पुणे विभागात कोरोना बाधित 2 हजार 885 रुग्ण आहेत. सध्या येथे ॲक्टीव रुग्ण 1 हजार 891 आहेत. विभागात 157 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 91 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
-सातारा जिल्हयात 114 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 14 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 98 आहे.
-सोलापूर जिल्हयात 182 बाधीत रुग्ण असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 29 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 141 आहे.
-सांगली जिल्हयात 37 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 26 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 10 आहे.
-कोल्हापूर जिल्हयात 15 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे तर 6 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 आहे.
-आजपर्यंत विभागात एकूण 29 हजार 319 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 27 हजार 795चा अहवाल प्राप्त झाला आहे. 1 हजार 524 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 24 हजार 930 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 885 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे. आजपर्यंत विभागात 85 लाख 23 हजार 712 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 3 कोटी 46 लाख 46 हजार 506 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 74 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

अधिक वाचा  पुण्यात मिरवणूक संपण्यास एक तास लागण्याची शक्यता; अलका चौकात आतापर्यंत १२४ मिरवणुका पार