पुणे – करोनाच्या पार्श्‍वभुमीवर जिल्ह्यात टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात हाताला काम नाही, करोनामुळे बाहेर पडणं अवघड अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्‍न मजुरांपुढे उभा आहे. जवळचे पैसे संपल्याने पुढे काय असा प्रश्‍न सतावत असताना जिल्हा परिषदेकडून रोजगार हमी योजनेचे कामे सुरू केल्याने मजुरांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्याच्या विविध तालुक्‍यात 438 कामांवर 2 हजार 278 मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
जिल्ह्यात टाळेबंदीमुळे अनके मजुरांचा रोजगार बंद झाला आहे. मजुरांची लॉकडाऊनच्या काळात उपासमार होऊ नये म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना अंतर्गत या मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, त्यानुसार जिल्ह्यात कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला. जिल्ह्यातील मजूरांचे सर्वेक्षण करून, त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील मजुरांची उपासमार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेची कामेही सुरू केल्याने मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे.
गावातील मजुरांची संख्या लक्षात घेऊन तीन ते चार कामे मंजुर केली जाणार आहे. ही कामे वैयक्तीक स्वरूपाची तसेच सुरक्षित अंतर पाळणे शक्‍य होईल अशी कामे निवडण्यात येणार आहेत. वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वरूपातील कामे आहेत. त्यामध्ये घरकुल, शोषखड्डे, रस्त्यांचे कामे सुरू आहेत. याशिवाय जिल्ह्यातील बेरोजगारांचे सर्वेक्षण करण्यात असून, कामाची गरज असणाऱ्यांचे जॉबकार्ड बनवून, त्यांना लगेच काम उपलब्ध करून देण्याच्या जिल्हा परिषदेकडून देण्यात आल्या आहेत.
तालुकानिहाय कामे व कंसात मजुर संख्या
आंबेगाव 32 (179), बारामती 35 (193), भोर 49 (131), दौंड 48 (195), हवेली 1 (10), जून्नर 119 (765), खेड18 (73), मावळ 10(99), मुळशी 6(30), पुरंदर 46(183), शिरूर 61(369), वेल्हे 13 (51).

अधिक वाचा  मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण; तिसऱ्या टर्ममध्ये घेणार मोठा निर्णय? देशभरात लवकरच निवडणुका…