जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरासह राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, पुणे या दोन प्रमुख शहरांच्या पाठोपाठ आता मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबाद शहरात देखील करोनाबाधितांचा आकडा कमालीचा वाढला आहे. आज औरंगाबादेत आणखी 17 नवे पॉझिटव्ह रुग्ण आढळले असून शहारातील कोरनाबाधितांची संख्या आता 500 च्या उबंरठ्यावर म्हणजेच 495 वर पोहचली आहे.
या मुळे आता करोना प्रादुर्भावाच्या दृष्टीने अगोदरच रेडझोमध्ये असलेल्या औरंगाबाद शहारातील नागरिकांची चिंता आता अधिकच वाढली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील संजयनगर, कटकटगेट, बाबर कॉलनी, असेफिया कॉलनी, भवानीनगर, रामनगर (मुकुंदवाडी), सिल्कमिल्क कॉलनी येथील रुग्णांचा समावेश आहे.
शहारातील रुग्ण संख्या अधिकच वाढत आहे. शुक्रवारी दिवसभरात शहरात तब्बल 100 रुग्ण आढळल्याची नोंद झाली आहे. शुक्रवारी शहारातील करोनाबाधितांची संख्या 478 वर होती. शनिवारी सकाळी यामध्ये 17 नव्या रुग्णांची भर पडल्याने आता करोनाबाधितांची शहरातील एकूण संख्या 495 झाली आहे.