नवी दिल्ली : देशात करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असतानाच विरोधी पक्षाची चिंता मात्र वाढलेली दिसतेय. गुरुवारी, अचानक काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी हे काँग्रेसचा हात सोडून भाजपच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या. या चर्चा जेव्हा सिंघवी यांच्यापर्यंत पोहचल्या तेव्हा त्यांनी सोशल मीडियावरच याचं उत्तर देऊन लोकांच्या शंका दूर केल्या. सिंघवी यांनी आपल्याबद्दलच्या या चर्चा अफवा असल्याचं म्हटलंय. हे केवळ गॉसिप आहेत, असं त्यांनी म्हटलंय.
‘हमारी अफवाह के धुंए वहीं से उठते हैं… जहां हमारे नाम से आग लग जाती है…’ असंही त्यांनी एका ट्विटमध्ये म्हटलंय. तर आणखीन एका ट्विटमध्ये ‘अफवाह थी कि मैं बीमार हूं, लोगों ने पूछ पूछ कर बीमार कर दिया’ असंही त्यांनी म्हटलंय.
सिंघवी यांच्यासोबतच काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनीही सिंघवी काँग्रेसचा हात सोडण्याच्या चर्चा अफवा असल्याचं म्हटलंय. ‘अफवा पसरवणाऱ्या या स्रोतांचा मूळ उद्देश प्रतिष्ठा धुळीत मिळवण्याची आहे’ असंही सुरजेवाला यांनी ट्विट केलंय.

अधिक वाचा  भाजप उमेदवाराच्या गाडीत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, मंत्र्यांसमोरच उमेदवार-पदाधिकाऱ्यांमध्ये खडाजंगी, व्हिडिओ व्हायरल