मुंबई: बॉलिवूडची सुपरस्टार गायिका नेहा कक्कर नेहमीच चर्चेत असते. नेहा सध्या चर्चेत असण्याचं कारण म्हणजे जगातली टॉप गायिकांच्या रांगेल आली आहे, असं आपण म्हणू शकतो. कारण जगभरात यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या गायिकाच्या यादीत नेहानं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान पटकावलं आहे.
नेहानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत ही माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ‘Ex acts chArt’द्वारे २०१९ मध्येजाहिर केली आहे. त्यात नेहा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगभरातल्या मोठ्या आणि प्रसिद्ध गायिकांना नेहानं यात मागे टाकलं आहे. नेहाला ४.५ बिलियन लोकांनी युट्युबवर सर्च केलं आहे. इतकंच नव्हे तर जगभरात करोडो चाहते असलेली प्रसिद्ध गायिका सेलेना गोमेझ ही दहाव्या क्रमांकावर आहे.कि केरल जी, ब्लॅकपिंक, बिली एलिस यांनाही नेहानं मागे टाकलं आहे. त्यामुळं नेहाच्या चाहत्यांमध्ये एकच उत्साह पाहायला मिळतोय. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
नेहाचा थक्क करणारा प्रवास
नेहाचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. नेहा आणि तिची बहीण सोनू देखील गायक असून त्या दोघी सुरुवातीला देवीच्या जागरण कार्यक्रमांमध्ये भजनं गायच्या. यासाठी तिला केवळ तिला केवळ ५०० रुपये मिळायचे. त्यानंतर ती ‘इंडियन आयडॉल’ या रिअॅलिटी शोमध्ये नेहा स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. तिथूनच तिचा हा यशाचा प्रवास सुरू झाला. तिनं नंतर मागं वळून पाहिलं नाही. नेहाकडं आता प्रसिद्धी, पैसा सर्व काही आहे. पण तिचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमधून तिचा हा थक्क करणारा प्रवास दिसून येतो.
नेहा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.तुम्हाला आठवत असेल की, इंडियन आयडॉल ११च्या एका एपिसोडमध्ये नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाचा किस्सा गाजला होता. अर्थात, खऱ्या आयुष्यात त्यांच्यामध्ये तसं काहीच नाही. पण नेहानं नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. होय, नेहानं आदित्यसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यात नेहा आणि आदित्यनं एकमेकांचा हात पकडला आहे. त्या फोटोला देण्यात आलेली ‘लॉकडाऊन संपल्यानंतर…’ ही कॅप्शन पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या कॅप्शनवरून आदित्य आणि नेहा एकत्र येणार का? अशा चर्चा रंगू लागल्या आहेत, पण ऑफस्क्रीन की ऑनस्क्रीन हे स्पष्ट झालेलं नाही.