मुंबई- महाराष्ट्राला आणि त्यातही मुंबईकरांना अरुण गवळी हे नाव माहीत नाही असं होणार नाही. डॅडी नावाने प्रसिद्ध असलेला कुख्यात गँगस्टर अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे आज लग्न बंधनात अडकणार आहेत. लॉकडाउनमधील सर्व नियमांचं पालन करून हे लग्न होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दगडी चाळीत काल योगिता आणि अक्षयच्या हळदीचा समारंभ पार पडला. स्वतः अक्षयने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हळदीचे फोटो शेअर केले. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता. तेव्हाच लग्नाची तारीखही नक्की करण्यात आली होती. २९ मार्चला हे लग्न होणार होतं. मात्र अचानक आलेल्या लॉकडाउनमुळे लग्न पुढे ढकललं. अखेर आज दोघं लग्नाच्या बेडीत अडकले. लॉकडाउनच्या नियमांमुळे दगडी चाळीतचं दोघांचं लग्न पार पडणार असून लग्नाला मोजून १५ ते २० जवळचे नातेवाईक उपस्थित असतील असं सांगण्यात आलं आहे. यातही सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा लक्षात घेत फक्त गवळी आणि वाघमारे कुटुंबियच लग्नाला उपस्थित राहू शकणार आहेत.
गरिबांना मदत करणं अभिनेत्याला पडलं महागात
विशेष म्हणजे अक्षय मुळचा पुण्याचा. लग्नासाठी त्याने पुणे पोलिसांची परवानगी मिळवली आणि तो मुंबईत आला. इन्स्टाग्रामवर मेहंदीचे फोटो शेअर करत त्याने मुंबई आणि पुणे पोलिसांचे आभार मानले. दगडी चाळीतच लग्न पार पडणार असल्याचं गवळी कुटुंबियांनी आग्रापाडा पोलीस ठाण्यात माहिती दिली. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचा मुद्दा लक्षात घेऊन लग्नाला उपस्थितांना सॅनिटायझर आणि फेसमास्क देण्यात येतील. अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी पाच वर्षांपासून एकमेकांना ओळखत होते. अक्षयने फत्तेशिकस्त, बस स्टॉप, दोस्तीगिरी, बेधडक या सिनेमां काम केलं आहे तर योगिता ही महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेसाठी काम करते.

अधिक वाचा  भाजपच्या बड्या मंत्र्याकडून उद्धव ठाकरेंच कौतुक; …..पुण्यात फक्तं यामुळंच विजय! भुवया उंचावल्या!