मुंबई : आज संध्याकाळी राज्या सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार 43 जणांचा मुळे मृत्यू झाला. राज्यात 1216 नवीन रुग्णांची नोंद झाली. राज्यातील एकूण संख्या 18,120 पर्यंत पोहोचली आहे. अजूनही महाराष्ट्रातली कोरोनाग्रस्ताची संख्या कमी होण्याच नाव घेत नाही. देशभरात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रातच आहेत. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब ही की, राज्यातल्या विविध रुग्णालयात किंवा क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल असलेल्या एकून रुग्णांपैकी फक्त 1 टक्का रुग्णसंख्या व्हेंटिलेटरवर आहे. 59 टक्के रुग्णांमध्ये लक्षणंही दिसत नाहीत.
राज्यातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या 8816 रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार विश्लेषण केलं. या एकूण भरती रुग्णांपैकी 5228 ( म्हणजे 59 %) रुग्ण हे लक्षणं विरहित आहेत. 3209 (36 %) रुग्ण हे सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे आहेत. तर 424 ( 5 %) रुग्ण हे गंभीर स्वरुपाची लक्षणं दिसणारे आहेत. त्यापैकी 236 (म्हणजे 3%) रुग्ण ऑक्सिजन आवश्यक असणारे आहेत तर 92 (1%) रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता लागलेली आहे. उर्वरित 96 रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात भरती आहेत. आज दिवसभरात राज्यात 207 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण 3301 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
धारावीत चिंता वाढली
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. धारावीत आज नव्या 50 रुग्णांची नोंद करण्यात आली असून एकूण रुग्णसंख्या 783 पर्यंत पोहोचली आहे. केवळ धारावीतच आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे माहीम या भागात 2 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून येथील एकूण रुग्णसंख्या 66 पर्यंत पोहोचली आहे. आज दादर या भागात 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून येथील आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 96 पर्यंत पोहचली आहे.

अधिक वाचा  चतृ:शृंगीच्या दर्शनात नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना सुखद धक्का; माता-भगिनींनी या निर्णयावर मानले राज्य शासनाचे आभार