मुंबई : टेरिफ रिचार्जचे दर वाढल्यानंतर टेलिकम्युनिकेशन कंपन्या ग्राहकांना अनेक ऑफर देत आहेत. वेगवेगळ्या डेटा ऑफर, अनलिमिटेड कॉलिंगचे खास प्लॅन कंपन्या ग्राहकांना देत असतात. तरीही अनेक ग्राहकांकडे दोन सिम कार्ड असतात. त्यांना एक सिमकार्ड सुरु ठेवण्यासाठी किमान रिचार्ज महिन्याला करावा लागतो. त्यासाठी जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडियाचे काही स्वस्तातले प्लॅनही आहेत. त्या प्लॅनमध्ये ग्राहकांचे सिम कार्ड सुरु राहते आणि कॉलिंग, इंटरनेट यांचाही वापर करता येतो.
एअरटेलचा 45 रुपयांचा प्लॅन असून त्यावरून 28 दिवसांसाठी 2.5 पैसे प्रति दराने लोकल आणि एसटीडी कॉल करता येतो. तसंच 5 पैसे प्रति सेकंद दराने नॅशनल व्हिडिओ कॉल आणि 50 पैसे प्रति MB दराने डेटा वापरता येते. याशिवाय एसएमएस 1 रुपया प्रति मेसेज आहे. 45 रुपयांशिवाय 49 रुपयांचा प्लॅनही एअरटेलनं दिला आहे. त्यामध्ये 38.52 रुपयांचा टॉकटाइम आणि 100 एमबी डेटा मिळतो. याची मुदत 28 दिवसांसाठी
व्होडाफोन आयडियाचासुद्धा 49 रुपयांचा प्लॅन आहे. यामध्ये 38 रुपये टॉकटाइम, 100 एमबी डेटा आणि 2.5 पैसे प्रति सेकंद दराने लोकल/ नॅशनल कॉल्स करता येतात. या प्लॅनची वैधता 28 दिवस असणार आहे. जिओचा 28 दिवसांसाठी 75 रुपयांचा प्लॅन आहे. त्यामध्ये ग्राहकांना 3 जीबी इंटरनेट डेटा मिळतो. तो डेटा संपल्यानंतरही 64 kbps स्पीडने इंटरनेट वापरता येतं. याशियाव कॉलिंगसाठी 500 मिनिटं मिळतात. तसेच जिओ अॅप्सचं सब्सक्रिप्शनही मिळतं.
जिओचा आणखी एक प्लॅन असून त्यात 2 जीबी डेटा दिला जातो. 98 रुपयांच्या या प्लॅनमध्ये 300 एसएमएस फ्री आणि जिओ अॅप्सचा अॅक्सेसही दिला जातो. हा प्लॅन 28 दिवसांसाठी असून नॉन जिओ कॉलिंगसाठी वेगळा IUC रिचार्ज करावा लागतो.