पुण्यासह राज्यात दारू विक्री सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने काढताच पुणे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असतांनाच दारू खरेदीसाठी एकच झुंबड उडाल्याचे चित्र सोमवारी दिसून आले. दारू दुकाने उघडण्यापूर्वीच मद्यप्रेमींनी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्या. परिणामी, फिजिकल डिस्टंन्सिंगचा पुरता बोजवारा उडाला शहरात ठिकठिकाणी अनियंत्रित गर्दीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला, पोलीस बळाचा वापर करावा लागला व विक्री बंद करावी लागल्याचे ही निदर्शनास आले.

पुणे शहरात अनेक ठिकाणी विक्री सुरू झाली तर पुणे ग्रामीणमध्ये बहुतेक दुकाने उघडली असल्याचे निदर्शनास आले असून दारू विक्रीला मोठया प्रमाणावर सुरू झाली आहे. आणि तेथे मद्यप्रेमींनी एकच गर्दी होत आहे. पुणे शहरात दारू विक्री सुरू करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा असून तो घातक ठरणार आहे.

अधिक वाचा  शरद पवारांना मोठा दिलासा! आत्ता चिन्हांची चिंता संपली; विधानसभेपूर्वी निवडणूक आयोगाने घेतला मोठा निर्णय

सद्यस्थितीत पोलीस प्रशासनावर वाढता ताण असतांना असा निर्णय घेणे गरजेचे नव्हते. काल पुणे शहरात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. शहरात अनेक ठिकाणी दाट लोकवस्तीचा भाग असून फिजिकल डिस्टंन्सिंगचे नियमांचे पालन होत नसल्याने गंभीर परिस्थिती उदभवू शकते.

तरी सर्व बाबींचा गांभीर्याने विचार होऊन पुणेकरांच्या जिवीताच्या सुरक्षेसाठी शहरातील मद्य विक्री तात्काळ स्थगिती द्यावी असे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले आहे.