करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलं आहे. या काळात नेहमी टिव्ही कॅमेऱ्यासमोर असणारे आजी-माजी खेळाडू, सेलिब्रेटी हे देखील घरात राहून आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत. भारताचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकरही या लॉकडाउन काळात आपल्या घरातच आहे. घरात असताना सचिन कधीतरी स्वयंपाक घरात जाऊन पदार्थ बनवतो हे आपण सर्वांनी पाहिलं आहे. मात्र लॉकडाउन काळात सचिनची लाडकी लेक साराने आपल्या बाबांना एक खास सरप्राईज दिलं आहे.
साराने सचिनसाठी खास बिटाचे कबाब बनवले होते. लाडक्या मुलीने आपल्यासाठी बनवलेले कबाब म्हटल्यावर सचिनने मिनीटभरात ही डिश फस्त केली. सोशल मीडियावर सचिनने हा फोटो पोस्ट केला आहे.
करोनाविरुद्ध लढ्यात सचिनने आपला सक्रीय सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्री-पंतप्रधान सहायता निधीला मदत करण्यापासून ते गरजू लोकांना जिवनावश्यक वस्तू पुरवण्यापर्यंत सर्व बाबतीत सचिन आघाडीवर होता. याव्यतिरीक्त अनेक आंतरराष्ट्रीय संस्थाच्या स्वच्छतेबद्दलच्या कँपेनमध्येही सचिन सहभागी होता.

अधिक वाचा  बारामतीमध्ये विधानसभेसाठी उमेदवार कोण? सुप्रिया सुळे यांनी स्पष्टच सांगितले…