राज्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मुंबई व पुणे ही दोन्ही शहरं यामध्ये आघाडीवर आहेत. आज पुणे शहरात दिवसभरात ६५ करोना बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे शहरात रुग्णांची संख्या १९४३ झाली आहे. तर चार रुग्णाचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या १११ झाली आहे. दरम्यान ५३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज १४ दिवसानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ५२ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
दरम्यान, आज महाराष्ट्रात करोनाचे ८४१ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर २४ तासात ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रुग्णसंख्या १५ हजार ५२५ इतकी झाली आहे. मुंबईची रुग्णसंख्या ९ हजार ७०० च्या पुढे गेली आहे तर महाराष्ट्रातली रुग्णसंख्या ही १५ हजार ५०० च्या पुढे गेली आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.