पुणे : कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार उडाला आहे. महाराष्ट्रातही कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. पुण्यातील 5 मे पर्यंतची क्षेत्रिय कार्यालयनिहाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या समोर आली आहे. यामध्ये सर्वाधित रुग्ण हे भवानी पेठेत आढळून आले आहे.
भवानी पेठेत सर्वाधिक433 रुग्ण आढळून आले आहे. तर त्यानंतर ढोले पाटील परिसरात 322 आणि शिवाजीनगरमध्ये 234 रुग्ण आढळून आले. तर पुण्यात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या 1943 वर पोहोचली आहे. पुण्यात गेल्या 24 तासांत 65 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झालीय तर चार कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यात 76 गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.
पुण्यातील क्षेत्रिय कार्यालयनिहाय कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ( 5 मेपर्यंतची)
भवानी पेठ – 433 (सर्वाधिक)
ढोले पाटील – 322
शिवाजीनगर – 243
येरवडा – 217
कसबा – 172
धनकवडी – 124
वानवडी – 104
बिबवेवाडी – 76
हडपसर – 58
नगररोड – 58
कोंढवा – 33
सिंहगडरोड -16
वारजे-कर्वेनगर – 11
कोथरूड – 05
औंध-बाणेर – 04
उपनगर – 70
वारजे-माळवाडीतील एका 11 वर्षांच्या मुलाचा बळी
तर कोरोनाचा संसर्ग आता ग्रामीण भागातही पोहोचला आहे. कोरोनाने वारजे-माळवाडीतील एका 11 वर्षांच्या मुलाचा बळी घेतला आहे. कोरोनामुळे मृत झाल्याची ही या भागातील पहिलीच घटना आहे तर वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना आहे.
या मुलाला काही दिवसांपासून ताप येत होता. त्याच्यावर घरीच उपचार सुरू होता. मात्र, त्याती प्रकृती आणखीच खालावल्याने त्याला पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. सोमवारी सकाळी त्याचा कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, रात्री उशीरा त्याचा मृत्यू झाला. या मुलाच्या संपर्कातील 34 जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यांचा रिपोर्ट येणे बाकी आहे.
वाढत्या कोरोनारुग्णांचं प्रमाण बघता प्रशासनानं काही नियमात बदल केले आहेत. 69 प्रतिबंधित क्षेत्रात ( Micro containment Zones) निर्बंध अधिक कडक करण्यात येत आहेत. तर उर्वरित ठिकाणी पुणेकरांना थोडा मोकळा श्वास घ्यायला परवानगी देण्यात येणार आहे.

अधिक वाचा  आजपासून आरटीई प्रवेश सूरू; एकाच टप्प्यात सोडत एक प्रतीक्षा यादी होणार : प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी