राज्यात मागील दोन दिवसांपासून मद्य विक्रीला सुरुवात झाल्याने, दारूच्या दुकाना बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचे पहावयास मिळाले. या दारू विक्रीचे अनेक माध्यमांनी वार्तांकन देखील केले आहे. याच दरम्यान पुण्यातील बिबवेवाडी भागातील एक पत्रकार दारू पिणार्‍या व्यक्तीचे फोटो काढत होते. त्यावेळी चार जणांच्या टोळक्याने त्यांना मारहाण केल्याची घटना घडली. भूषण गरुड असे या मारहाणीत जखमी झालेल्या पत्रकारांचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी भागात पत्रकार भूषण गरुड हे दारू पिणार्‍या व्यक्तीचे काल(मंगळवार) रात्री 8 वाजेच्या सुमारास फोटो काढत होते. त्यावेळी चार जणांच्या टोळक्याने त्याचा अंगावर धावून जात त्यांना मारहाण केली. या घटनेत भूषण गरुड हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तक्रार प्राप्त झाली असून आता जखमी भूषण गरुड यांचा जवाब नोंदविल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे बिबवेवाडी पोलिसांनी सांगितले आहे.

अधिक वाचा  अंगणातील दिडवर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला गिन्नी गवतात केलं  ठार; पूर्ण गावावर शोककळा, शेतकरी संतप्त