नैसर्गिक आपत्ती, संघर्ष व हिंसाचार यामुळे २०१९ मध्ये भारतात ५० लाख लोकांनी अंतर्गत स्थलांतर केले. त्या खालोखाल फिलिपाइन्स, बांगलादेश, चीन या देशात अंतर्गत स्थलांतराचे प्रमाण जास्त होते, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. यूएन चिल्ड्रेन फंड म्हणजे युनिसेफने लॉस्ट अ‍ॅट होम या अहवालात म्हटले आहे की, २०१९ मध्ये ३.३० कोटी लोकांनी स्थलांतर केले त्यात २.५ कोटी लोकांनी नैसर्गिक आपत्तीमुळे, तर ८५ लाख लोकांनी संघर्ष व हिंसाचारामुळे स्थलांतर केले आहे.

यात १.२० कोटी मुलांनी स्थलांतर केल्याचे निष्पन्न झाले असून ३८ लाख मुलांनी संघर्ष व हिंसाचारातून, तर ८२ लाख मुलांनी हवामानासह इतर आपत्तींमुळे स्थलांतर केले आहे. पूर्व आशिया व पॅसिफिकमध्ये १ कोटी तर दक्षिण आशियात ९५ लाख लोकांनी स्थलांतर केले आहे. भारत, फिलिपाइन्स, बांगलादेश व चीन या देशांना नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसला असून तेथे आपत्तींच्या कारणामुळे जगात होणाऱ्या स्थलांतरापैकी ६९ टक्के स्थलांतर झाले आहे.

अधिक वाचा  सरकारने सरळच करायचं ठरवलं तर, संस्था राहिल का?; अजित पवारांचा शिक्षण संस्थाचालकांना सज्जड दम

वादळे, पूर यामुळे हे घडून आले. यात ८२ लाख मुलांचा समावेश होता. भारतात अंतर्गत स्थलांतर झाले असून २०१९ मध्ये ५,०३,७००० जणांनी स्थलांतर केले त्यात ५०,१८,००० जणांनी नैसर्गिक आपत्तींमुळे तर १९,००० जणांनी संघर्ष व हिंसाचारातून स्थलांतर केले. फिलिपाईन्समध्ये ४.२७ दशलक्ष लोकांनी नैसर्गिक आपत्ती, संघर्ष व हिंसाचाराचून स्थलांतर केले. बांगलादेशात ४.०८ दशलक्ष, तर चीनमध्ये ४.०३ दशलक्ष लोकांनी स्थलांतर केले.