श्रीनगर : पुलवामा जिल्ह्यातील बेगपोरा गावात मंगळवारी भारतीय लष्कराने काश्मीरचा मोस्ट वॉन्टेड अतिरेकी आणि हिज्बुलचा मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाझ नायकूचा खात्मा केला. नायकूला तिथेच मारलं जेथे तो जन्माला आला होता, त्याचं परिवार देखील तिथे राहतं. रियाझ नायकू हा ए प्लस प्लस कॅटगरीचा अतिरेकी होता.
अनेक दिवसापासून भारतीय सैनिक हे नायकूच्या मागावर होते, रियाझ नायकूवर १२ लाखांचं बक्षिस होतं. याआधी ४ वेळेस तो पळण्यास यशस्वी झाला होता.

पण यावेळेस भारतीय जवानांनी त्याचा खात्मा केला, तो कसा हे पाहा इनसाईड स्टोरीमधून…
१० पॉईंटमध्ये समझून घ्या, क्रूरकर्मा रियाझ नायकू कसा मारला गेला…
पुलवामामध्ये आपलंच गांव बेगपोरामध्ये इंडियन आर्मीकडून खात्मा

अधिक वाचा  अयोध्येतील राम मंदिरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी; उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी यांच्याकडून अलर्ट जारी

रियाझ नायकू आईला भेटण्यासाठी गावी आला होता.

भारतीय सैनिक अनेक दिवसापासून नायकूच्या मागावर होते.

नायकू त्याचं गाव बेगपोरामध्ये त्यांच्या घरी पोहोचल्याची गुप्त माहिती मिळाली.

माहिती मिळताच सैनिकांनी त्यांच्या घरालं घेरलं

6- 1 से 1.5 किलोमीटर तक पूरे इलाके को घेर लिया गया.

एक ते दीड किलोमीटर संपूर्ण भागाला घेरलं

ज्या घरात नायकू लपला होता, त्या घराला सैनिकांनी ब्लास्टने उडवून दिलं.

रियाझ नायकू वाचून त्या घरातून दुसऱ्या घरात गेला.

अखेर सुरक्षादलाने नायकूचा त्या ठिकाणीच खात्ना केला.

भारतीय लष्कराचे जवान, सीआरपीएफ, जम्मू आणि काश्मीर पोलिसांचे बडे अधिकारी या ऑपरेशनवर नजर ठेवून होते. या आधी रियाझ नायकू चार वेळेस सुरक्षा दलाला चकमा देण्यात यशस्वी झाला होता. एकदा त्राल या ठिकाणी भुयारातून तो सुरक्षा दलाला चकमा देऊन पळाला होता. पण यावेळेस त्याची कबर त्याच्याच गावात खोदली गेली.
अतिरेकी नायकूला संपवणं हे केवढं मोठं यश
हिज्बुल मुजाहिद्दीनचा काश्मीर खोऱ्यातला कमांडर इन चीफ होता
खुंखार अतिरेक्यांच्या लिस्टमध्ये नायकूची कॅटेगरी ए प्लस प्लस होती.
अतिरेकी बुरहान वानीला मारल्यानंतर हा मोठा अतिरेकी चेहरा होता.
सब्जार बट्टचा खात्मा केल्यानंतर हिज्बुलची कमान सांभाळली होती.
भारतविरोधी वाईट प्रचार करण्यासाठी पाकिस्तानचा तो पोस्टर बॉय होता.
काश्मीरच्या स्थानिक अतिरेक्यांमध्ये नायकूची चांगली पकड होती.
काश्मीरच्या युवकांना अतिरेकी बनवण्यासाठी तो दिशाभूल करत होता.
पोलिसांच्या नातेवाईकांचं अपहरण करण्यात तो सामिल होता.