हिंजवडी : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ४३ दिवस बंद असलेले हिंजवडीतील स्वर्गीय राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील कामकाज काही प्रमाणात सुरू होणार आहे. बुधवारपासून प्रत्येक कंपनीने ३३ टक्के कर्मचारी संख्येवर कामकाज सुरू करावे, कर्मचारी सुरक्षा आणि स्वच्छतेची जबाबदारी कंपन्यानी घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने हिंजवडी, माण, मारूंजी या तीन झोनमध्ये विस्तरलेल्या सुमारे सव्वाशे कंपन्यांतून तब्बल चार लाख आयटी अभियंते काम करतात. लॉकडाऊनमुळे गेले दीड महिना मोठा शुकशुकाट होता. लॉकडाऊनच्या काळात बहुतांश आयटी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्राम होमची सुविधा उपलब्ध करून दिल्याने बऱ्यापैकी कामकाज सुरू होते. त्यातील ७० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्राम होम शक्य होते. परंतु अन्य कर्मचाºयांना कंपनीत येणे आवश्यक होते.
हिंजवडीतील आयटी पार्क हा पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरालगत असला तरी, रेडझोन नसल्याने कंपन्या सुरू करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी काही कंपन्यांनी केली होती. त्यानुसार प्रत्येक कंपनीने ३३ टक्के कर्मचारी संख्येवर कामकाज सुरू करावे, कर्मचारी सुरक्षा आणि स्वच्छतेची जबाबदारी कंपन्यानी घ्यावी, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
हिंजवडीचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी म्हणाले, ह्यह्यकाही अटी शर्तींवर कंपन्या सुरू करण्याचा आदेश पोलिसांना प्राप्त झाला आहे. कंपन्या सुरू करताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे बंधनकारक आहे. प्रत्येक कर्मचारी किमान पाच फूट अंतरावर असेल. त्याशिवाय सॅनिटायझेशन, बस सुविधा आदी अटी पाळणे गरजेचे आहे. त्याची जबाबदारी कंपनी व्यवस्थापनाकडे सोपविण्यात आली आहे.

अधिक वाचा  कसब्यात भाजपला 15 हजार मताधिक्य; श्रेयाची चढाओढ दिवंगत माजी खासदार बापटांचे पुत्र गौरव बापट संतापले