मुंबई: देशावर आलेलं करोनाचं सावट अत्यंग गंभीर होत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी देशात शक्य ते सगळे प्रयत्न केलं जात आहे. करोनाचं हे युद्ध जिंकायचं असेल तर सरकारला आर्थिक बळ देणंही गरजेचं आहे. त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी दान करण्याचं आवाहन देशातील जनतेला केलं होतं. त्यांच्या आवाहनानंतर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी मोठी आर्थिक मदत केली. पण सिनेसृष्टीकडून देशासाठी काय देता येईल हा विचार सुरू असताना बॉलिवूडच्या कलाकारांनी एकत्र येऊन ऑनलाइन कॉन्सर्टचं आयोजन करण्याची कल्पना सुचली. बॉलिवूड कलाकारांची ही कल्पना यशस्वी ठरली असून या कॉन्सर्टच्या माध्यमातून तब्बल ५२ कोटींचा निधी जमा झाला आहे.
‘आय फॉर इंडिया’ ( I FOR INDIA)असं या कॉन्सर्टचं नाव होतं. या कॉन्सर्टमध्ये आमिताभ बच्चन, अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांचा सहभाग होता. विशेष म्हणजे घरातून बाहेर न पडता या कॉन्सर्टमध्ये सर्व कलाकारांनी सादरीकरण केलं. कॉन्सर्टमध्ये काही कलाकारांनी गाणी गायली तर काहींनी कविता वाचून दाखवल्या, काही कलाकारांनी स्टँड अप कॉमेडी देखील केली, विविध प्रकारची वाद्ये वाजवून कलाकारांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं.
… म्हणून नीतू कपूर यांनी मानले मुकेश अंबानी आणि कुटुंबियांचे आभार
बॉलिवूड कलाकारांच्या या ऑनलाइन कॉन्सर्टला प्रेक्षकांचा आणि त्यांच्या चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला असून जवळपास ३० लाख प्रेक्षकांनी फेसबुकवर या कॉन्सर्ट पाहिला आणि करोना विरुद्धच्या लढाईत दान करून आपलं योगदान दिलं. या कॉन्सर्टद्वारे मिळालेले ५२ कोटी पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी सरकारकडे सुपूर्त केले आहेत.

अधिक वाचा  प्रॉपर्टी शेअरतर्फे एसएम रिट योजनेतील 353 कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरसाठी मसुदा प्रस्ताव दाखल