नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्याने सगळ्यांची चिंता वाढली आहे. लॉकडाऊन संपायचे दिवस आणि रुग्णांची संख्या वाढायची वेळ एकच होत आहे. तर टेस्टिंग वाढविल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्रालयाने दिलं आहे. देशात गेल्या 24 तासांमध्ये 3900 नवे रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची एकूण संख्या वाढून 46433 झाली आहे. त्यात 32138 Active रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांमध्ये 195 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्तची ही सर्वात जास्त संख्या आहे. त्यामुळे देशातल्या मृतांचा एकूण आकडा 1568वर गेला आहे. तर आत्तापर्यंत 12726 जण बरे झाले आहेत.
महाराष्ट्रानंतर आता तामिळनाडू हे कोरोना वेगाने वाढणारं दुसरं राज्य झालं आहे. तिथे एकाच दिवसांत 500 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशात आता 12 दिवसांमध्ये रुग्णांची संख्या दुप्पट होत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. तर सोशल डिस्टन्सिंगसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने नवे नियम जाहीर केले आहे. त्यात लग्नासाठी फक्त 50 जणांना आणि अंत्यसंस्कारासाठी 20 जणांनाच एकत्र येण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या व्हायरसचा नाश करेल असं औषध नाही. मात्र उपलब्ध असलेल्या इतर औषधांचा या व्हायरसवर कसा परिणाम होतो याबाबत प्रयोग केले जात आहेत. अशीच काही औषधं वापरून उपचार केले जात आहेत. त्यात आता हायड्रोक्लोरोक्विन (hydroxychloroquine) आणि रेमडेसिवीर (Remdesivir) औषध कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी असल्याचं सांगितलं जातं आहे. यापैकी कोणतं औषध प्रभावी आहे, याबाबत तज्ज्ञांनी मत व्यक्त केलंय.
काऊन्सिल ऑफ सायन्टिफिक अँड इन्डस्ट्रिअल रिसर्चचे (Council of Scientific & Industrial Research – CSIR) डायरेक्टर डॉ. शेखर सी मांडे यांनी रेमडेसिवीर आणि हायड्रोक्लोरोक्विन यापैकी कोणतं औषध प्रभावी आहे, याबाबत माहिती दिली आहे.
डॉ. शेखर सी. मांडे म्हणाले, या दोन्ही औषधांमध्ये सध्या तुलना करणं योग्य नाही कारण रेमडेसिवीरला यूएसमध्ये अतिशय गंभीर रुग्णांवर उपचारासाठी मंजुरी देण्यात आली आहे. शिवाय या दोन्ही औषधांचे सध्या ट्रायल सुरू आहे, त्यामुळेदेखील त्यांची तुलना करू शकत नाही. त्यामुळे आता तरी कोणतं औषधं चांगलं आहे आणि कोणतं नाही हे सांगू शकत नाही.

अधिक वाचा  नांदेडमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला मोठा धक्का?; काल मध्यरात्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घेतली भेट