“आपण लोकशाही पद्धतीनं एका व्यक्तीच्या हातात सत्ता दिली आहे. कधी पीएम केअर्स फंड निर्माण होतो, तर कधी एका फटक्यात काही निर्णय घेतले जातात. सर्व अधिकार हे पंतप्रधानांकडे आहेत. आपल्याला अमेरिकेकडून काही शिकलं पाहिजे. याबाबक नंतर विचारमंथन करावं लागेल. आपल्या विद्यमान पंतप्रधानांना कोणाचा सल्ला वगैरे लागत नाही,” असा टोला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केलं.
“डॉ. मनमोहन सिंग हे ज्यावेळी पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्याकडेही इकॉनॉमिकल अॅडव्हायझरी काऊन्सिल होती. परंतु आता आहे का नाही माहित नाही. आपल्या विद्यमान पंतप्रधानांना कोणाचा सल्ला वगैरे काही लागत नाही,” असं चव्हाण म्हणाले. राज्याच्या हीरक महोत्सवानिमित्त ‘साठीचा गझल .. महाराष्ट्राचा‘ या ‘लोकसत्ता‘तर्फे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात पृथ्वीराज चव्हाण सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी अनेकांच्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली.
“सचिव पदापर्यंत व्यक्ती पोहोचणं हे कठीण असतं. त्यांना प्रशासनाचा अनुभव असतो. पण आमच्यासारख्यांना आपल्या मतदारसंघापुरता अनुभव असतो. राजकीय आणि प्रशासकीय परिपक्वता हे दोन्ही येण्यासाठी वेळ लागतो. आज आपले पंतप्रधान काही ठराविक लोकांचाच सल्ला घेतात. जे गुजरात कॅडरचे लोक आहेत त्यांचा ते सल्ला घेतात,” असं ते यावेळी म्हणाले. “IFSC गुजरातला नेण्याचं त्यांनी पूर्वीपासूनच ठरवलं होतं. १ मार्च २०१५ ला मोदींनी निर्णय घेऊन गांधीनगरच्या गिफ्टसिटीमध्ये हे सेंटर हलवण्याचा निर्णय घेतला होता. ते अनेक निर्णय तडकाफडकी घेतात. त्यांनी नोटबंदी करतानादेखील कोणताही विचार केला नव्हता,” असंही त्यांनी सांगितलं.

अधिक वाचा  ठरलं! घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुती 100 उमेदवारांची पहिली यादी?; अमित शहांच्या उपस्थित बैठकीत चर्चा पूर्ण